Satara News : सावरकर गौरव यात्रेत छत्रपतींच्या वारसांनी सहभागी होणे दुर्देवी...

Laxman Mane ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात सावरकरांनी छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराची सून हिचा केलेला सन्मान अत्यंत चुकीचा असून, महिलांबद्दल तिरस्कार करणारी भाषा वापरल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.
Laxman Mane, Satara
Laxman Mane, Satarasarkarnama

Laxman Mane News : देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, हा द्विराष्ट्रवाद सावरकरांनी मांडून जातीभेद निर्माण केला. राष्ट्रदोही सावरकरांच्या ब्राम्हणी हिंदुत्वाचे विचार समाजात रुजविण्याचे काम सत्तापिपासू भारतीय जनता पक्ष BJP करत आहे, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने Laxman Mane यांनी केली. दरम्यान, सावरकर गौरव यात्रांमध्ये छत्रपतींच्या वारसांनी सहभागी होणे हे दुर्देवी असून भाजपच्या या कृतीच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (ता.७) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय स्वक्लेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज सातारा शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने आयोजित केलेल्या सावरकर गौरव यात्रेवर टीका केली. लक्ष्मण माने म्हणाले,‘‘सावरकर यांच्या पत्रात माफीनामा असल्याने त्यांनी शरणागती मागितली होती. त्यामुळे सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक नसून राष्ट्रदोही आहेत. तरी देखील भाजप राज्यभरात सावरकर यात्रा काढत आहे. इतिहासाची मोडतोड करून तो लोकांसमोर मांडण्याची परंपरा ब्राम्हणांची सुरू आहे.

आपण सर्वजण या भूमीला मातृभूमी मानतो. मात्र, सावरकर पितृभूमी मानत होते. यावरुनच ते किती राष्ट्रदोही होते हे दिसून येते. सावरकर यांचा खोटा इतिहास लोकांपर्यंत येत असून, ते किती ढोंगी होते, हेही समाजाला माहिती पडणे आवश्‍यक आहे. देशभरात भाजपची सत्ता असल्याने सत्तेच्या नशेचा वापर करत सावरकर यात्रा काढून चुकीची मांडणी समाजासमोर आणली जात आहे.’’

Laxman Mane, Satara
Satara Shivsena News: बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका : शंभूराज देसाईंचा सल्ला

गेल्या काही वर्षात केवळ पैसा आणि दलाली सुरु असून, आरएसएसने देशाचा तुरुंग केल्याचीही टीका त्यांनी केली. समाजाचे उद्दात्तीकरण करणाऱ्या सावरकरांचा निषेध करुन समाजाने त्यांचे विचार आत्मसात केल्यास घातक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. अशोक जाधव, चंद्रकांत खंडाईत आदी उपस्थित होते.

Laxman Mane, Satara
Rohit Pawar On BJP: ''महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही..''; रोहित पवारांकडून भाजपची कोंडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com