Maharashtra-Karnatka Dispute : जतचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; पाणी न मिळाल्यास कर्नाटकात सामविष्ठ होण्याबाबत निर्णय ठरणार

जोपर्यंत जतला पाणी देण्याची घोषणा होऊन निधीची तरतूद होत नाही. तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्णय तुकाराम महाराज यांनी बोलून दाखवला
Tukaram Maharaj
Tukaram MaharajSarkarnama

जत (जि. सांगली) : जत (Jat) तालुक्याच्या वंचित गावातील शिष्टमंडळ सांगलीच्या (Sangli) कृष्णामाईचे पाणी घेऊन उद्या मंगळवारी (ता. २९ नोव्हेंबर) मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार आहे. कृष्णेचे पाणी दुष्काळी जतला देण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पत्रकार परिषदेत केली. (Jat's delegation will meet the Chief Minister tomorrow)

ते म्हणाले, तालुक्यातील शिष्टमंडळ आठ तलावातून पाणी घेऊन सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयावर एकत्रित येणार आहे. येथून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. तेथून कृष्णाकठा कडे पायी चालत कृष्णामाईचे पाणी घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. शिवाय, बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनच कृष्णामाईचा कलश त्यांच्याकडे सोपवून जत तालुक्यातील जनतेची भावना पटवून देऊ, जोपर्यंत जतला पाणी देण्याची घोषणा होऊन निधीची तरतूद होत नाही. तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्णय तुकाराम महाराज यांनी बोलून दाखवला.

Tukaram Maharaj
Maharashtra-Karnataka border dispute : अक्कलकोटहून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक बंद

नवीन विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होण्याचा कालावधी मोठा आहे. तत्पूर्वी जलसंपदा विभागाने मायथळ कालव्यातून पाणी देण्यासाठी सर्वे करून 2019 मध्ये अंदाजे दहा कोटींचा खर्चाची तरतूद केली होती. मात्र, शासनाने जतला पाणी देण्यासाठी लवादाकडे पाण्याची तरतूद नसल्याने नवीन योजनेस मंजुरी देता येत नसल्याचे स्पष्ट केले होते.

Tukaram Maharaj
राष्ट्रवादीला रायगडमध्ये मोठा धक्का : पालीच्या नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

आता सहा टीएमसी पाणी आरक्षित झाले आहे. जलसंपदा विभागाने सर्वे केलेली जुनी योजना सुधारित अंदाजे वीस कोटींचा खर्च करून ती मार्गी लावावी. यातून मायथळ कालवा फोडून व्हसपेठ तलावात पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजोबाचीवाडी, अंकलगी, उटगी, निगडी बु., लमानतांडा व उमदी पर्यंत पाणी जाते. तर व्हसपेठ मधून गुड्डापूर तलावात पाणी सोडल्यास आसंगी जत, गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंडगी, करजगी, हळ्ळी, बालगाव, येथे ओढापात्रातून पाणी जाऊ शकते. शिवाय, महाराष्ट्र शासनाने कर्नाटक विनंती करून कलमडी कालव्यातून पाणी दिल्यास सिध्दनाथ, आसंगी तुर्क, करेवाडी, मोटेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधीतांडा, तिकोंडी, जालिहाळ पर्यंत पाणी जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com