Maharashtra-Karnataka Border Dispute : अक्कलकोटहून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक बंद

सोलापूर आगारातून अक्कलकोटमार्गे कर्नाटकात जाणाऱ्या ६० बस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून ही वाहतूक बंद आहे.
ST Bus Service
ST Bus ServiceSarkarnama

सोलापूर : महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकातील (Karnataka) सीमाप्रश्न (border dispute) चांगलाच पेटला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी सांगली जत तालुक्यातील काही गावांवर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आमचे आहे, असे म्हटले हेाते. त्याला महाराष्ट्रातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. मात्र, त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्यामुळे अक्कलकोटहून कर्नाटकला जाणारी आणि कर्नाटकातून अक्कलकोटला येणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. (Maharashtra-Karnataka border dispute : ST Bus service from Akkalkot to Karnataka stopped)

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट, सोलापूर आमचेच असल्याचा दावा केल्याने कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पुन्हा चिघळला आहे, त्यामुळे अक्कलकोटवरून कर्नाटकात जाणारी व कर्नाटकातून अक्कलकोटवरून येणारी एसटी वाहतूक बंद आहे.

ST Bus Service
राष्ट्रवादीला रायगडमध्ये मोठा धक्का : पालीच्या नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी असा भाग आमचाच असल्याचा दावा करीत, तेथील लोक महाराष्ट्रात यायला तयार असताना कर्नाटक सरकार त्याला विरोध करीत आहे. तरीसुद्धा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट व सोलापूर आमचे असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. लोकप्रतिनिधींसह सरकारने त्यांचे कान टोचले आहे. आता तो विषय शांत होऊ लागला आहे. पण, अजूनही एसटी वाहतूक सुरळीत झालेली नाही.

ST Bus Service
आढळरावांनी निवडणुकीची तयारी सुरू केली : बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या ११७ शाखाप्रमुखांची नियुक्ती

सोलापूर आगारातून अक्कलकोटमार्गे कर्नाटकात जाणाऱ्या ६० बस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून ही वाहतूक बंद आहे. कर्नाटकात जाणाऱ्यांसाठी विजयपूरहून एसटी सेवा सुरू असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com