जयंत पाटील यांनी गटबाजीवरून श्रीगोंदयातील नेत्यांना दिल्या कानपिचक्या

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष ( NCP ) संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील ( Jayant Patil ) हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत.
जयंत पाटील
जयंत पाटील sarkarnama
Published on
Updated on

श्रीगोंदे : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत. या निमित्त ते श्रीगोंद्यात गेले होते. श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी कार्यकऱ्यांत वाढत्या गट बाजीवर त्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल (बुधवारी) रात्री उशिरा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात श्रीगोंद्यातील नेत्यांमधील गटबाजीवरुन कानपिचक्या देतानाच पदाधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. विशेष म्हणजे बैठकीला केवळ राष्ट्रवादीच्या ठराविक पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण असतानाही काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची हजेरी चर्चेचा विषय ठरली.

जयंत पाटील
जयंत पाटील आणि अजितदादांनी काँग्रेसमध्येच भांडणाची वात लावली...

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अंकुश काकडे, रुपाली चाकणकर, माजी आमदार राहूल जगताप, घनशाम शेलार, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड, भाऊसाहेब खेतमाळीस उपस्थितीत होते. ही बैठक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपुरतीच होती. माध्यम प्रतिनिधीनींनाही बैठकीत हजर राहू देवू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तथापि बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक थेट व्यासपिठावर विराजमान होते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत बैठकीचा वृत्तांत बाहेर पाठविण्याची चोख व्यवस्था केली होती.

पाटील यांनी बैठकीत प्रदेश कार्यालयाला श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी पक्षाविषयी आलेला एक अभिप्राय वाचून दाखविला. त्यात जगताप व शेलार या दोन नेत्यांमध्ये गटबाजी सुरु असल्याने त्याचा फटका कार्यकर्ते व पक्षाला बसत असल्याचा आशय होता. येथे पक्षवाढीला पोषक वातावरण असले तरी या नेत्यांमधील गटबाजी अडचणीची ठरु शकते. पाटील यांनी यांनी हा अभिप्राय वाचून दाखवित श्रीगोंद्यात नेत्यांमध्ये अलबेल नसल्याचे सूचित करतानाच एकत्र काम करा असा अप्रत्यक्ष सल्ला नेत्यांना दिला.

बैठकीला उपस्थितीत असणाऱ्या विविध अध्यक्षांची फिरकीही पाटील यांनी घेतली. कुणाची किती जणांची कार्यकारणी आहे आणि किती सदस्य बैठकीला आहेत असे विचारताच अनेकांची तोतरी वळाली. एका अध्यक्षांने तर कार्यकारणीतील बहुतेक सदस्यांना कोरोना झाल्याने कारण दिल्यावर पाटील यांनी स्मितहास्य केले. पक्ष मजबूत होईल सगळ्यांनी लक्ष देवून कामाला लागा असा संदेश देत पाटील यांनी त्यांचे तालुक्यावर बारीक लक्ष असल्याचे सूचित केले.

जयंत पाटील
जयंत पाटील यांच्या दौऱ्याने वाढली मोनिका राजळेंसमोरील समस्या

मंत्र्यांच्या साक्षीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पानउतारा

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष मिनल भिंताडे यांचे पती मोहन भिंताडे यांनी घनश्याम शेलार यांचे भाषण थांबवित पालिकेच्या कारभाराचा जोरदार मुद्दा मांडला. बड्यांची अतिक्रमणे जागी ठेवून सामान्यांच्या मालकीच्या जागेतून पालिका रस्ता करताना दादागिरी करते. व्यासपिठावर जे काँग्रेस पदाधिकारी बसले आहेत ते भाजपातून आलेले आहेत. आपली सत्ता आली की ते पुन्हा आपल्यात येवून बसलेत, यांना वेळीच ओळखा असे ओरडून सांगत भिंताडे यांनी नगरसेवकांची केलेली थेट तक्रार चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com