अधिवेशनात निलंबित झालेल्या जयंत पाटलांचे इस्लामपूरमध्ये जंगी स्वागत

राष्ट्रवादीचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल केला सत्कार
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

इस्लामपूर (जि. सांगली) : हिवाळी अधिवेशनात निलंबन झाल्यानंतर इस्लामपूर (Islampur) मतदारसंघात परत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी इस्लामपूर, वाळवा आणि मिरज तालुक्यातील सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. (Jayant Patil received a warm welcome in Islampur)

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अपशब्द उच्चारल्यामुळे जयंत पाटील यांचे नागपूर हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. शनिवार आणि रविवारी अधिवेशन नसल्याने जयंत पाटील हे सांगलीत परतले आहेत. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आल्यानंतर जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

Jayant Patil
भाजपची ताकद; राणेंचा बूस्टर डोस...तरीही शिवसेनेने जिंकली दोन माजी सभापतींची गावे!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे आज दुपारी कारखाना कार्यस्थळावर आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी आमदार पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत कारखाना कार्यस्थळावर पेठ, साखराळे, नेर्ले, येडेमच्छिंद्र, कामेरी, वाटेगाव, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, बावची, गोटखिंडी, कोरेगाव, रेठरेहरणाक्ष आदी वाळवा तालुका व मिरज पश्चिम भागातील ४५ गावांचे नूतन सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Jayant Patil
‘अजितदादा, तुमची वेळ चुकली...तो शपथविधी दुपारी झाला असता तर तुम्ही आज मुख्यमंत्री असता’ : भाजप आमदाराने फोडले गुपीत

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाळवा तालुक्यातील ८१ पैकी ७१ गावात,तर मिरज पश्चिम भागातील ६ पैकी ५ गावात आ.जयंतराव पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्ता मिळविली आहे. आमदार पाटील हे निकालाच्या दरम्यान नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात व्यस्त होते. त्यांचे शनिवारी दुपारी आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर धाव घेतली.

Jayant Patil
फडणवीसांनी न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणीही SIT नेमावी : शिवसेनेचे आव्हान

जयंत पाटील यांनी तांदुळवाडी,कि.म.गड,कापुसखेड, बहादूरवाडी,दुधारी,नवेखेड,जुनेखेड, बहे, सुरुल,शिरगाव,ऐतवडे खुर्द,ऐतवडे बु:, कार्वे,फारणेवाडी,लवंडमाची,मर्दवाडी, बनेवाडी, गाताडवाडी,खरातवाडी,महादेववाडी, तुजारपूर, देवर्डे, माळवाडी, सावळवाडी आदी गावचे नूतन सरपंच व त्या-त्या गावांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Jayant Patil
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे मोठे विधान : ‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक’

यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,संजय पाटील, शुभांगी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com