Jayant Patil Vs Ajit Pawar : घाबरलेल्या सरकारने तिजोरीचा दरवाजाच काढला; जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

Ladki Bahin Yojana : घोषणा केल्यानंतरही त्यांना विधानसभा निवडणुकीबाबत आत्मविश्वास वाटत नाही. त्यातून स्वतःची जाहिरात करण्यासाठी 270 कोटी रूपये राखून ठेवले आहेत
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभेसाठी महायुती सरकारने अनेक योजनांचा पाऊस पाडला. मात्र यावेळची निवडणूक वेगळी आहे. सरकार घाबरलेले आहे.

ज्यांनी 9 अर्थसंकल्प मांडले त्यांनी 10 व्या अर्थसंकल्पावेळी तिजोरीचे दारच काढून टाकले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवारांसह राज्य सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, लोकसभेनंतर राज्य सरकार घाबरले आहे. यातूनच वाटेल त्या घोषणा करून टाकल्या आहेत. अनेक घोषणा करून अर्थमंत्र्यांनी तिजोरीचा दरवाजा काढून ठेवला आहे.

या घोषणा केल्यानंतरही त्यांना विधानसभा निवडणुकीबाबत आत्मविश्वास वाटत नाही. त्यातून स्वतःची जाहिरात करण्यासाठी 270 कोटी रूपये राखून ठेवले आहेत, असा निशाणाही पाटील यांनी अजितदादांवर Ajit Pawar साधला.

आता वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर, चौथ्या पानावर तिघांचेही फोटो असतात. टीव्हीवर सासू-सुनांच्या भांडण्याच्या मालिकेतही मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde येतात. मोबाईलवर जाहिराती येतील. गावागावत प्रचंड बॅनर लागतील. जाहीरातीसाठी 280 कोटी आता आहेत, त्यात आणखी 100 कोटी वाढतील.

एवढे करूनही जमेना म्हटल्यावर त्यांनी योजना दूत योजना काढली. त्यासाठी 300 कोटी वेगळे राखून ठेवले आहेत. विधानसभेत निरंकुश सत्ता आणण्यासाठी त्यांचे सर्व काही प्रयत्न सुरू केले आहेत, याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

Jayant Patil
Shiva Swarajya Yatra : जयंत पाटलांनी सांगितले मोहोळमधील विजयाचे गणित; महाआघाडीच्या नेत्यांना दिला 'हा' सल्ला

निवडणुका आल्यानंतर सरकार विविध मार्गातून पैसे वाटण्याचे काम करत आहे. राज्यात सध्या भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक प्रकरणे पुढे येणार आहेत. जालनातील एका रस्त्याचे 11 हजार कोटीचे टेंडर 15 हजार कोटींना दिले. विरारहून आलीबाग रस्त्याचे टेंडर 20 हजार कोटींचे टेंडर 26 हजार कोटींना जाण्याची माहिती आहे. एका किलोमीटरला 200 कोटीहून अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे ऐवढे पैसे त्यांच्याकडे आले कुठून, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राचे राजकारण नासवले..

उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगड फेक, नारळ फेक करण्याचे काम कोण करतेय? नेत्यांना अडवण्याची संस्कृती वाढीला लागली आहे. राज्याचा सुसंस्कृत राजकारण नासवण्याचे काम कोण करतोय? लोकशाहीमध्ये मुक्तपणाने संचार आणि मुक्तपणे बोलण्याचा अधिकार कोण हिरावून घेत असेल, तर आपली जनता ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा जयंत पाटील Jayant Patil यांनी दिला आहे.

Jayant Patil
Bjp News : उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक; अयोध्येत सीएम योगी सक्रिय, अखिलेशही ॲक्शन मोडमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com