Bjp News : उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक; अयोध्येत सीएम योगी सक्रिय, अखिलेशही ॲक्शन मोडमध्ये

Political News : बॅकफूटवर आलेल्या सत्ताधारी भाजपने पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने बैठका सुरू केल्या आहेत.
Yogi Adityanath, Akhilesh Yadav
Yogi Adityanath, Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Political News : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 10 जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरीही सर्वच राजकीय पक्षाने निवडणूक लवकरच होणार असल्याचे गृहीत धरून त्यासंदर्भात राजकीय हालचाली वाढवल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे बॅकफूटवर आलेल्या सत्ताधारी भाजपने (Bjp) पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने बैठका सुरू केल्या आहेत.

या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. या जागांसाठी पक्षांने काही नावेही निश्चित केली आहेत. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशमधील एक जागेचा सर्वात जास्त उल्लेख केला गेला. ती म्हणजे फैजाबाद लोकसभेची जागा आहे. ज्यामध्ये रामनगरी अयोध्येचा समावेश आहे. त्या ठिकाणच्या पराभवाची चर्चा सर्वाधिक झाली होती.

त्यातच आता अयोध्येतील मिल्कीपूर या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. ही जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सीएम योगी (Cm Yogi) यांनी रामनगरी अयोध्येचा दोन वेळा दौरा केला.

Yogi Adityanath, Akhilesh Yadav
Bjp News : भाजपची अशीही कोंडी; विधानसभेसाठी विद्यमान आमदारांना नारळ, नव्या चेहऱ्यांना द्यावी लागणार संधी

नुकत्याच केलेल्या अयोध्या दौऱ्यावेळी बोलताना सीएम योगी म्हणाले,'अयोध्येच्या सन्मानाची काळजी सर्वांनी करायला हवी आणि पराभवाची चिंता कोण करणार हे हिंदू समाजाने पाहणे आवश्यक आहे. अयोध्येतील विजयाची चिंता नाही, मात्र येथील पराभवाची ज्या प्रकारे चर्चा केली जात आहे, त्यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक निकालाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीत सीएम योगी यांनी पोटनिवडणुकीत सर्व जागा जिंकण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा कानमंत्रही सर्वांना दिला.

Yogi Adityanath, Akhilesh Yadav
Sharad Pawar : मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार? शरद पवारांनी सुचवला मार्ग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com