Jaykumar Gore News : पाण्यासाठी ही शेवटची निवडणूक, यापुढे विकासाच्या मुद्द्यावर लढू; जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

Satara Politcal News : माढा मतदारसंघात भाजपला अडचणीत आणत जयकुमार गोरेंचे मताधिक्य कसे कमी होईल, यासाठी बारामती, फलटणमधून फिल्डिंग लावली गेली. माझ्याविरोधात इथल्या सर्व नेत्यांना एकत्र करूनही त्यांचा तुम्ही कार्यकर्त्यांनी टिकाव लागून दिला नाही.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama

विशाल गुंजवटे

Maan News : येणाऱ्या काळात माण-खटावचा पाण्याचा दुष्काळ आपण मिटवलेला असेल. त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ही पाण्यासाठी लढली जाणारी शेवटची निवडणूक असेल, हा शब्द आहे. त्यापुढच्या निवडणुका विकास कामांच्या मुद्द्यावर लढू, असे आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

माण तालुक्यातील दहिवडी येथे आभार मेळाव्यात ते बोलत होते. जयकुमार गोरे (Jaykumar gore) म्हणाले, ‘‘जिहे- कठापूर सिंचन योजनेचे पाणी उत्तर व पश्चिम माणच्या गावांना जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत पाण्याचा लढा सुरूच राहणार आहे. आजपर्यंत दिलेले सर्व शब्द पाळलेत. जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत पोचत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, हा पण शब्द दिलाय अन् तो पूर्ण करूनच निवडणूक लढवणार आहे. या योजनेतून उर्वरित वंचित गावांना पाणी दिले जाईल. (Jaykumar Gore News)

माढा मतदारसंघात भाजपला (Bjp) अडचणीत आणत जयकुमार गोरेंचे मताधिक्य कसे कमी होईल, यासाठी बारामती, फलटणमधून फिल्डिंग लावली गेली. माझ्याविरोधात इथल्या सर्व नेत्यांना एकत्र करूनही त्यांचा तुम्ही कार्यकर्त्यांनी टिकाव लागून दिला नाही. कार्यकर्त्यांनो, विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. आतापासून कामाला लागा, असा सल्ला त्यांनी दिला.

आमदार, खासदार बनायला निघालेल्यांना गावात किती मते मिळाली? याचा विचार करून स्वप्ने पाहावीत. गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला जयकुमार गोरे यांनी विरोधकांना लगावला.

Jaykumar Gore
Varsha Gaikwad : प्रवास तोच, वळण नवे..! वर्षा गायकवाड दिल्लीतही आक्रमक

विरोधात तगडा उमेदवार द्या

विरोधकांकडे निवडणुका लढविण्यासाठी पाणी, विकास, एमआयडीसी हे मुद्दे नसून त्यांचा एकच मुद्दा आहे, फक्त जयकुमारला पाडायचंय बस्स. त्यामुळे माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या,असे आव्हान त्यांनी दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी कायम आग्रही होतो. भाजप व शिवसेनेच्या (Shivsena) सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी नमुद केले.

Jaykumar Gore
Sunil Kedar and Rahul Gandhi : सुनील केदारांना हवाय राहुल गांधीप्रमाणे न्याय? ; दिला जातोय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com