Jaykumar Gore: मंत्री जयकुमार गोरेंना घरातूनच आव्हान; शेखर गोरेंनी पुन्हा तलवार काढली, आता 'बार्गेनिंग'कडे लक्ष

Local Body Elections: भाजपमधून पूजा सचिन वीरकर, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या गटातून गौरी विशाल माने या प्रमुख उमेदवारामध्‍ये प्रथम दर्शनी काँटे की टक्कर होण्याची चिन्हे दिसून येत आहे.
Shekhar Gore - Jayakumar Gore
Shekhar Gore - Jayakumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Phaltan News: म्हसवड पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप व महाविकास आघाडीने मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्‍तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, या पदासाठी मंगळवार (ता.18) अखेर एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपचे (BJP) नऊ अर्ज आहेत. पालिकेच्या एकूण दहा प्रभागांतील वीस जागांसाठी तब्बल 123 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

भाजपमधून पूजा सचिन वीरकर, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या गटातून गौरी विशाल माने या प्रमुख उमेदवारामध्‍ये प्रथम दर्शनी काँटे की टक्कर होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीत सहभागी झालेले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालिका कार्यालयात तालुका पातळीवरील प्रमुख नेत्‍यांसह स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, जिल्‍हा बँकेचे उपाध्‍यक्ष अनिल देसाई, किशोर सोनवणे, अरविंद पिसे, दिलीप तुपे, राष्‍ट्रीय समाज पक्षाचे दादासाहेब दोरगे, काँग्रेसचे बाबासाहेब माने, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, विकास गोंजारी आदींचा समावेश होता.

सर्वात शेवटी भाजपनेही शक्तिप्रदर्शन करत मिरवणुकीने पालिका कार्यालयात नगराध्यक्षपदासाठी पूजा वीरकर यांच्यासह आणखी तीन महिलांचे अर्ज दाखल केले. यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, शेखर गांधी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, दत्तात्रय भागवत, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, सुनील पोरे, माजी नगरसेवक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युवराज सूर्यवंशी, सुरेश बाळासाहेब पानसांडे आदी उपस्थित होते.

वंचितमधून नगराध्यक्षपदसाठी रूपाली वाल्मीक सरतापे यांनी अर्ज दाखल केला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. भाजपने सर्व दहा प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल करताना शेखर गोरे यांच्या गटाने नगराध्यक्षपदासह सहा प्रभागांत आठ जणांचे अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत भाजपबरोबर शेखर गोरे गट यासह अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनीही एकत्रित येऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

गौरी माने अपक्ष उतरणार का?

पालिका निवडणुकीसाठी सर्वप्रथम शेखर गोरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत भाजपमधूनच नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई गौरी माने यांचा अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

भाजपने मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या नेतृत्वाखालील पूजा वीरकर यांना एबी फॉर्म आज दिल्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी डावलल्‍याची चर्चा आहे. त्‍यामुळे गौरी माने या अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार का? अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजप उमेदवारांमध्‍ये धाकधूक

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपमधून नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी होती. यामुळे मंत्री गोरे यांनी सर्व इच्छुकांना समक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करीत समजूत काढून आपण उमेदवारी अर्ज भरावेत, आपली नावांची यादी पक्षश्रेष्ठीकडे पाठविली जाईल व तेच अंतिम निर्णय घेतील.

पक्षाकडून त्यांची नावे, एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात दाखल केली जातील पक्षाकडून ज्यांना उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करावा लागेल, अशी भूमिका घेतल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम वेळेपर्यंत भाजपच्या सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढतच चालली होती. दुपारी तीनच्या सुमारास भाजपकडून एबी फॉर्म दाखल करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com