
Solapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेऊन महायुती सरकारने जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पण यातही भाजपने मास्टर ट्रोक खेळत आपल्या पदरात महत्वाचे जिल्हे पाडून घेतले आहेत. असाच गेम भाजपने माढ्याच्या बाबत खेळत एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. येथे जयकुमार गोरे यांच्या गळ्यात पालमंत्रीपदाची माळ टाकत मोहिते-पाटलांच्या वारूला लगाम घालण्याचे काम केलं आहे. यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ताकद मिळणार असून गोरे सोलापुरात भाजप वाढण्यावर भर देतील.
सध्याच्या घडीला राज्याच्या राजकीय प्रवासासाठी पश्चिम महाराष्ट्र महत्वाचा असून येथे सोलापूर केंद्रस्थानी आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आपला दबदबा वाढवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. यामुळेच सोलापूर जयकुमार गोरे, सांगलीत चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर -माधुरी मिसाळ यांना भाजपने थेट मैदानात पाठवले आहे.
जयकुमार गोरे यांची सोलापूरचे पालकमंत्रिपदी फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ताकद देण्यासह मोहिते पाटील यांनी रोखण्यासाठी आहे. यंदाच्या लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अपयश आले होते. तर त्यांच्यासाठी गोरे यांनी जीवाचे राण केले होते. मात्र बाजी धैर्यशील मोहिते पाटलांनी मारली. हे अपयश गोरे यांच्या फार जिव्हारी लागेल होते. यातूनच त्यांनी मोहिते पाटलांना सतत लक्ष केलं होते.
गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळण्यामागे त्यांनी केलेल्या टीकेचे फळ असल्याचे म्हटले जात आहे. यावरून गोरे यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. गोरे यांनी, मी स्वतःला भाग्यवान समजतो... मी आमदार झालो, मंत्री झालो. आणि आता पालकमंत्रीही.
या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. विठुरायाच्या भूमीचे पालकमंत्री पद मला मिळाले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण कोणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झालेली नाही. आणि तसे कोणी म्हणणेही चुकीचे असल्याचे गोरे यांनी म्हटले आहे. आपण जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन जाणार असून जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभा असेन असेही मंत्री गोरे म्हणाले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला होता. पराभवानंतर निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना अनेकदा टार्गेट केले. त्यांनी राम सातपुते यांच्यासह माढ्यातील विरोधकांची मोठ बांधली. यातूनच राम सातपुते यांनीही मोहिते पाटलांवर हल्ला चढवला होता. पण आता मोहिते पाटलांचे कट्टर विरोधकच जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने मोहिते पाटील यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.