Jaykumar Gore News : कंत्राटी भरतीचे पाप उद्धव ठाकरेंचेच; जयकुमार गोरेंचा आघाडीच्या नेत्यांवर पलटवार

Maharashtra Politics : पृथ्वीराज बाबांसारख्या सुसंस्कृत नेत्यांनी चुकीचे वक्तव्य करणं म्हणजे विश्वासाला तडा लावणं आहे.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama

Satara : कंत्राटी नोकर भरतीचे पाप हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या काळातले आहे. त्यावेळी जाणता राजा कोण होतं, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरती केली होती, अशा शब्दांत माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप पक्ष हा सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात आज एक नंबरवर आहे. माढा मतदारसंघात आज भाजपचा खासदार असून, 2024 मध्येही भाजपचाच खासदार राहणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून येणार आहे. दोन्ही मतदारसंघ भाजप ताकदीने लढवणार आहे, असा दावा आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गोरे बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते.

Jaykumar Gore
Suresh Dhas News : महिलेला मारहाण प्रकरण; सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया

जयकुमार गोरे म्हणाले, "गेल्या काही दिवसांत कंत्राटी भरतीचा विषय राज्यात गाजवला जात आहे. युवकांच्या मनात चुकीचे बिंबवले जात आहे. हे महायुतीचे सरकार कंत्राटी भरती करतंय असं वातावरण निर्माण केलं जात आहे. वास्तविक कंत्राटी भरती 2003 पासून सुरू आहे. त्यावेळी सत्तेत आघाडीचे सरकार होते, तेथून पुढे वारंवार निर्णय घेतले. काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांसारख्या सुसंस्कृत नेत्यांनी चुकीचे वक्तव्य करणं म्हणजे विश्वासाला तडा लावणं आहे,"

जेव्हा कंत्राटी भरतीचा जीआर निघाला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांनी जीआर कधी निघाला हे जाहीर करावे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 10 ऑगस्ट 2021 ला मोठी कंत्राटी भरती काढली होती. त्यानंतर 27 सप्टेंबर 2021 ला एक निर्णय घेतला होता. तो जीआर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना काढला होता. तरी ते एवढे बेधडक खोटे कसे काय बोलत आहेत.

चोरांच्या उलट्या बोंबा

आज पृथ्वीराज चव्हाण हे दिशाभूल करत आहेत, ते मुख्यमंत्री होते, तेव्हा एकनाथ शिंदे हे मंत्री होते का?, कशाला जनतेची दिशाभूल करता, कांदा दर, शेतीचे नुकसान यावरून जनतेची दिशाभूल करत आहात. शेतकऱ्यांचे नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने केले. त्या सरकारचे कर्ते करवते कोण होते. पवारसाहेब होते. या चोरांच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. दुसऱ्यावर आरोप करताना चार बोटे आपल्याकडे असतात. पाणी वाटपावेळी पवारसाहेबांनी सातारा जिल्ह्यातील जनतेवर अन्याय केला.

मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेची मागणी केली तशी मी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी पाण्याची मागणी करणार आहे, असे सांगत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मीच सभागृहात सर्वात आक्रमकपणे मुद्दे मांडले आहेत. मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली.

Jaykumar Gore
Manoj Jarange News : तात्पुरती मलमपट्टी नको, कायमचा उपचार करा; अन्यथा, पेलणार नाही असं आंदोलन करू!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com