Fadnavis-Thackeray Meeting : फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाचे सूचक भाष्य; म्हणाले, ‘सब होगा...अच्छा होगा..!’

Jaykumar Gore suggestive statement : मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ही भेट का झाली, मी सांगू शकत नाही.
Devendra Fadnavis- Raj Thackeray-Jaykumar Gore
Devendra Fadnavis- Raj Thackeray-Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 June : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आज अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची बातमी आली आणि राज्यात पुन्हा एकदा राजकीय धुराळा उडाला. फडणवीस आणि राज यांच्या भेटीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मोदी है तो मुमकीन है, सब होगा, अच्छा होगा...’ असे सूचक भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये चर्चा झाली आहे. त्या चर्चेचा तपशील आणि भेटीचे कारण पुढे आलेले नसले तरी राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूचक विधान केले आहे. गोरे हे फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे गोरेंचे विधान महत्वपूर्ण मानले जाते.

जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीचा विषय हा राज्याच्या स्तरावरचा विषय आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ही भेट का झाली, मी सांगू शकत नाही. भेटीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हेच चांगले सांगू शकतील.

उद्वव ठाकरे-मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चेवरही जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, जी युती झालीच नाही, ती फिसकटण्याचा प्रश्नच कुठे येतो. आघाडी सोबत जायचं की युती सोबत जावं की स्वतंत्र निवडणूक लढावावं, हा राज ठाकरे यांचा निर्णय आहे. त्यांच्या अधिकारावर आपण बोलणं, हे योग्य नाही.

Devendra Fadnavis- Raj Thackeray-Jaykumar Gore
Raju Khare Shivsena Entry : गोगावलेंपाठोपाठ प्रताप सरनाईकांचेही राजू खरेंच्या शिवसेना प्रवेशावर मोठे भाष्य; म्हणाले ‘ऑपरेशन टायगर चालूय...’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातोय, एवढा वेगाने महाराष्ट्र पुढे जाताना ह्या विकासगंगेमध्ये अनेक लोकं सोबत येत आहेत. अनेक पक्ष देखील अस्तित्वहीन होत आहेत, त्यामुळे हे सगळे पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाकडे पाहून येत आहेत, असा दावाही गोरेंनी केला.

Devendra Fadnavis- Raj Thackeray-Jaykumar Gore
Pratap Sarnaik : फडणवीस, नारायण राणेंनंतर सरनाईकांनीही नीतेश राणेंना सुनावले; म्हणाले ‘त्यामुळे आमचा बाप कोण?, हे सांगायची गरज नाही’

उद्योगमंत्री उदय सामंत आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्या भेटीबाबत गोरे म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवसेनेचे नेते आहेत, तर देशपांडे हे मनसेचे नेते आहेत. दोघांचे काय सुरु आहे, हे मला कसं काय माहिती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com