जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल; १७ फेऱ्यानंतर १३ हजारांचे भरभक्कम मताधिक्य

Kolhapur | Kolhapur north assembly election | Jayshree Jadhav | satyajeet Kadam : महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल
Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 result
Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 resultSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक मतमोजणी सध्या सुरु असून यात काँग्रेस आणि जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. एकूण २६ फेऱ्यांमध्ये या मतांची मोजणी होणार आहे. यात सध्या १७ म्हणजे अर्ध्याहुन अधिक फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून यात सर्वच्या सर्व फेऱ्यांमध्ये जयश्री जाधव यांची आघाडी पाहायला मिळाली. १७ व्या फेरी अखेर जाधव यांच्याकडे तब्बल १३ हजार ०९६ मतांची आघाडी आहे.

१७ व्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ६४ हजार ७८४ मत मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ५१ हजार ६८८ मत मिळाली आहेत. त्यामुळे जयश्री जाधव या १३ हजार ०९८ मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान १२ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या या भक्कम आघाडीसाठी काँग्रेस आणि त्यातही सतेज पाटील यांच्या कसबा-बावडा या बालेकिल्ल्याचा मोठा वाटा आहे. कसबा-बावडा भागातील मतमोजणी पहिल्या ३ फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली आहे. या तीन फेऱ्यांमध्ये जयश्री जाधव यांना तब्बल ७५०१ मतांची आघाडी मिळाली आहे.

Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 result
"आमदार जयश्री जाधव यांचे हार्दिक अभिनंदन" : कोल्हापुरात निकालापूर्वीच लागले बॅनर

एका बाजूला ही मतमोजणी सुरु असून निकाल येण्यास अद्याप काही अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच कोल्हापूर शहराच्या अनेक भागांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स देखील लागले आहेत. या बॅनरवर काँग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा उल्लेख किंगमेकर असा करण्यात आला आहे. तर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांचाही फोटो या बॅनरवर दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com