Jitendra Awhad: आव्हाड एकाकी पडल्याने भ्रमिष्ट; मुश्रीफांच्या विधानानंतर आव्हाडांनी काढला मंडलिक-मुश्रीफ वाद

Kolhapur Politics : आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही, असा मुश्रीफांचा दावा
Kolhapur Politics
Kolhapur Politics Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकेरी भाषेच टीका झाल्यानंतर त्यांनी मुश्रीफ आणि मंडलिक यांचा जुना वाद काढत मुश्रीफ यांनी कशी गद्दारी केली हेच काढले आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि आव्हाड यांचा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या तिकिटावर शिंदे गट आणि राष्ट्रवादीला निवडणूक लढवावी लागेल, असे विधान केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जहरी आणि एकेरी टीका केली आहे. मुश्रीफ यांनी आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केला आहे. यालाच सगळं कळतंय का? असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही. एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट अवस्थेत आहेत,अशी जहरी टीका करण्यात आली.

Kolhapur Politics
Pune Police: धक्कादायक: पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या सोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या. त्यात जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती. आम्ही भाजपसोबत जाणार त्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हते. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रिपदाची शपथ घेतली असती का ? आव्हाड यांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिप्रश्न केला आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांच्या या प्रतिक्रियेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुश्रीफ यांचा समाचारच घेतला आहे. एकेरी शब्द वापरणे हे मुश्रीफ यांची संस्कृती आहे. मुश्रीफ यांच्याबद्दल मी माझ्या राजकीय जीवनात पाच मिनिटे सुद्धा बोललेलो नाही. 2019 मध्ये पवारसाहेबांच्या घरी मीटिंग झाली होती. त्यावेळी सगळे नेते उपस्थित होते. त्यावेळी भाजप सोबत जाण्यासाठी मुश्रीफ यांनी टोकाचा विरोध केला होता. मी पत्रावर सही केली. पण बाहेर आल्यावर जयंत पाटील यांना सांगितले की मला हे मान्य नाही. जयंत पाटील यांना देखील ते मान्य होते. ते पत्र आजही जयंत पाटील साहेबांच्या खिशात असल्याचे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपसोबत जाण्यासाठी जे काय सांगणारे नेते होते त्यातील एक हसन मुश्रीफ होते. मी माझ्या बापाची कधीच गद्दारी केली नाही. सदाशिव मंडलिक यांच्यासोबत तुमचे काय संबंध होते? त्यांनी तुम्हाला कुठपर्यंत आणलं? हे सर्व कोल्हापूरकरांना माहीत आहे, बोलायला गेले तर मी खूप खोलात जाईल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Kolhapur Politics
Government Job: सरकारी नोकरीची संधी; 'या' विभागाने काढली 345 जागांची बंपर भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com