Shetkari Karjmukti : तेलगंणा सरकारचा कित्ता महाराष्ट्र सरकारनं गिरवावा ! ; शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा..

Maharashtra Political News: 'अबकी बार किसान सरकार' ही भारत राष्ट्र समितीची घोषणा प्रत्यक्षात आणली पाहिजे," असे मत मुरकुटे यांनी व्यक्त केले.
Maharashtra Should Waive Farm Loans
Maharashtra Should Waive Farm Loans Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News: "तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना १९ हजार कोटीची कर्जमाफी दिली, असाच निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे," अशी मागणी अशी भारत राष्ट्र समितीचे राज्य कार्यकारी सदस्य माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.

तेलंगणातील कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मुरकुटे यांनी श्रीरामपूर येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला. "ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनेही बीआरएस पक्षाला पाठींबा दिला आहे. उपेक्षित शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर 'अबकी बार किसान सरकार' ही भारत राष्ट्र समितीची घोषणा प्रत्यक्षात आणली पाहिजे," असे मत मुरकुटे यांनी व्यक्त केले.

Maharashtra Should Waive Farm Loans
Pathardi Talathi Bribe Case: लाचखोर महिला तलाठ्यास तीन वर्षे कारावास ; तीन हजारांची घेतली होती लाच

"शेतकरी हिताचे कल्याणकारी सरकार तेलंगणात आहे. तेलंगणात ८०% सिंचन झाले असून शेतीला चोवीस तास वीज,मोफत पाणी दिले जाते. पेरणीपूर्व एकरी क्षेत्राची कोणतीही मर्यादा न ठेवता दहा हजाराचे विना परतावा अर्थसहाय्य दिले जाते. अशा अनेक शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. तेलंगणा सरकार हे ख-या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आहे. राज्यात बीआरएसला शेतकऱ्यांचा मोठा पाठींबा मिळत आहे," असे मुरकुटे यांनी सांगितले.

यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे, सिद्धार्थ मुरकुटे, पुंजाहरी शिंदे, भाऊसाहेब उंडे उपस्थित होते.

तेलंगणा राज्यामध्ये कर्जमाफी केल्याबद्दल साताऱ्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे फटाके वाजवून आणि पेढे वाटप करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com