Kolhapur Politics: वाद चिघळणार! घाटगे-मुश्रीफ 'या' मुद्द्यावरून पुन्हा आमने-सामने; घाटगेंनी धाडली नोटीस

Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif: तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, गाव चावडी, जिल्हा परिषदेचा दवाखाना, शाहू हॉल यावर कागल संस्थान परिवाराचा मालकी हक्क आहे, असा दावा...
Kolhapur Political Conflict
Kolhapur Political ConflictSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीनंतर देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यातील वाद मिटण्याचे नाव नाही. कारण काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कागल मधील शाहू हॉलच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केले होते. मात्र त्याला आता समरजीत घाटगे यांनी नोटीस पाठवत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

कागलच्या संस्थानिकांचा या जागेवर मालकी हक्क असून या जागेवरील बांधकाम थांबवावे,न्यायालयीन लढाई सुरू असून सध्या इमारतीचे बांधकाम हे बेकायदेशीर आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस घाटगे परिवाराने नगरपालिकेसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक विभागाला पाठवली आहे. त्यामुळे कागल मधील हा जमिनीचा वाद पुन्हा एकदा चिघळणार असून घाटगे- मुश्रीफ या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत.

कागल मधील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, गाव चावडी, जिल्हा परिषदेचा दवाखाना, आणि नगरपालिकेचा शाहू हॉल यावर कागलच्या संस्थान परिवाराचे मालकी हक्क आहे, असा दावा केला जात होता. तर काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर ही जागा बळकवली असल्याचा आरोप केला होता.

Kolhapur Political Conflict
Shiv Sena News: ठाकरे सेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी तात्या लागले कामाला! इच्छुकांच्या मुलाखती...

या आरोपानंतर कागल मधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले होते. मात्र पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांनी नगरपालिकेच्या शाहू हॉलच्या नवीन इमारतीच्या बांधकाम कामाचे उद्घाटन केले होते. मात्र त्याला आता घाटगे यांच्याकडून आव्हान दिले जात आहे.

घाटगे परिवाराकडून नगरपालिकेसह जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद आणि सार्वजनिक विभागाला हे काम थांबवण्याचे न्यायालय मार्फत नोटीस पाठवली आहे. प्रवीणसिंह घाटगे, समर्जीत घाटगे, सुहासिनी देवी घाटगे, तेजस्विनी भोसले यांच्या वतीने एड.पी आर पाटील यांच्या वतीने 11 फेब्रुवारी रोजी ही नोटीस पाठवली आहे. या जागेची मालकी ही घाटगे परिवाराची असल्याचा दावा नोटीशी मध्ये केला आहे.

या नोटिसला प्रत्युत्तर म्हणून परिपत्रक काढून जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने आणि प्रकाश गाडेकर यांनी घाटगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. कागलचे अधिपती जयसिंगराव घाटगे उर्फ बाळ महाराज यांनी तहसील कार्यालय आणि परिसराची जागा ही सार्वजनिक कामासाठी दिली होती. शाहू हॉलची बांधकाम प्रारंभ दिवंगत विक्रम सिंह घाटगे यांनी केले होते.

राजर्षी शाहू महाराज यांचा घराण्याचा वारस सांगणाऱ्या समर्जित घाटगे यांनी चुकीच्या पद्धतीने आदेश तयार करून ही नोटीस पाठवली आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जागा नावावर करून घेतली आहे. नोटीस पाठवण्याचा प्रकार हा संतापजनक आहे. कागलची जनता ते सहन करणार नाही, असा इशारा भैया माने आणि प्रकाश गाडेकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com