karad Nagar Parishad News : महायुतीवर चर्चा होईल, पण नगराध्यक्ष आमचाच! भाजप आमदाराने चर्चेपूर्वीच विषय क्लिअर केला!

Karad Politics : कराड पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद भाजपचाच असावा, असा ठाम दावा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केला. महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादीने सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
Karad BJP Mayor Candidate, Atul Bhosale, Mahayuti Election
Karad BJP Mayor Candidate, Atul Bhosale, Mahayuti ElectionSarkarnama
Published on
Updated on

Karad Politics : कराड शहराने २०१६ च्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष निवडून दिला आहे. विधानसभेलाही शहरवासीयांनी मोठ्या अपेक्षेने मला आमदार केले. त्यामुळे कराडचा नगराध्यक्ष महायुतीचा व्हावा. गतवेळी भाजपचा नगराध्यक्ष असल्याने साहजिकच यावेळीही भाजपचाच उमेदवार असावा, त्यासाठी मित्रपक्षांनी मदत करावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी केले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

आमदार भोसले म्हणाले, महायुती म्हणून पालिकांना निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात नगराध्यक्षपदावर भाजपचा दावा असेल. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील नागरिकांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून दिला. विधानसभेलाही मला आमदार केले. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नगराध्यक्षपदासाठी भाजपचाच उमेदवार असावा यावार आम्ही ठाम आहोत.

हायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादीला निवडणुकीची चर्चा करण्यासाठी निमंत्रण देणार आहोत. त्यात नगराध्यक्षपदावरही चर्चा होईल. शहराच्या विकास लक्षात घेऊन एकत्रित तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होईल. भाजपची काम करण्याची पद्धत ठरली आहे. त्यानुसारच काम होईल. उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार पक्षाच्या शिखर समितीला आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक येतात. पदाधिकारी, उमेदवार व इच्छुकांशी सविस्तर चर्चा होते. त्यातून पात्र उमेदवार जाहीर होतात, असेही आमदार भोसले यांनी स्पष्ट केले.

Karad BJP Mayor Candidate, Atul Bhosale, Mahayuti Election
Satara Nagar parishad Election : शिवेंद्रराजे-उदयनराजेंची 'ऐतिहासिक' युती घोषणेपूर्वीच संकटात; नगराध्यक्षपदामुळे 'गेम' बदलणार?

कोणालाही शब्द दिलेला नाही :

आमदारांनी उमेदवारीबाबत शब्द''दिल्याचे सांगून काहीजण प्रभागात, तर काहीजण नगराध्यक्षपदासाठी फिरत आहेत. मात्र, आम्ही कोणालाही तसा शब्द दिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या पद्धतीनेच उमेदवार निवडीचे काम सुरू राहिली. कोणीही मी शब्द दिल्याचे सांगून प्रचार किंवा लोकांच्या गाठीभेटी घेऊ नये. प्रभागात फिरा. मात्र, उमेदवारी मिळणार आहे, म्हणून फिरू नका, पक्षाचे काम करण्यासाठी फिरा. त्यातून तुमचे काम पाहून पक्ष निर्णय घेईल, असे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com