Karad Vidhansabha : कराड 'दक्षिणे'त निधीवरून काॅंग्रेस अन् भाजपमध्ये कॉम्पिटिशन

Maharashtra Political News : या मतदारसंघात काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
pruthviraj Chavhan, atul bhosle
pruthviraj Chavhan, atul bhosle Sarkarnama
Published on
Updated on

Political News : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कराड दक्षिण मतदारसंघात निधीचा पाऊस पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. या दोघांत अटीतटीची लढत होते. त्यामुळेच कराड दक्षिण मतदारसंघात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये विकासकामांच्या निधीवरून सध्या चढाओढ सुरू आहे.

या मतदारसंघासाठी भाजपच्या डाॅ. अतुल भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या फंडातून तसेच हिवाळी अधिवेशानात पुरवणी अर्थसंकल्पात कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यानंतर आता काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना 2023-24 मधून विविध विकासकामांसाठी 8 कोटी 70 लाख 69 हजार इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे.

pruthviraj Chavhan, atul bhosle
Income Tax Raids: अबब ! खासदाराच्या घरात सापडली 'एवढी' मोठी कॅश; नोटा मोजता मोजता मशीनही थकल्या...

केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री, राज्यसभा व लोकसभेचे खासदार असल्यापासून सातारा आणि कराड परिसराच्या विकासासाठी कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणत मतदारसंघाचा कायापालट केला. गेली नऊ वर्षे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करत आहेत. या नऊ वर्षांतही त्यांनी विकासाची प्रक्रिया निरंतर सुरूच ठेवली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे चालू आर्थिक वर्षात त्यांनी विविध विकासकामांसाठी निधीची मोठ्या प्रमाणात मागणी केली होती.

या मागणीनुसार वडगाव हवेली, कार्वे, आणे, भरेवाडी, लटकेवाडी, शेवाळेवाडी - येवती, येरवळे, विंग, पोतले, कोळे, कापील, कोडोली, कार्वे, काले, खुबी, येणपे, शेवाळवाडी, टाळगाव, काजारवाडी, माटेकरवाडी, बांदेकरवाडी, म्हासोली, शेवाळवाडी, घराळवाडी, काटेकरवाडी, वारुंजी, गोटे, मुंढे, घारेवाडी, आणे, संजयनगर- शेरे, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, नारायणवाडी, जुजारवाडी, शिंदेवाडी, नांदगाव, घोगाव, कासारशिरंबे, मुळीकवाडी - गोटेवाडी, वहागाव - घोणशी - कोपर्डे हवेली - पार्ले बनवडी, येवती - घराळवाडी - मस्करवाडी - चव्हाणवाडी - धामणी - डाकेवाडी - निवी, आटके, बांदेकरवाडी - सवादे , गोटे  या गावांसाठी 8 कोटी 70 लाख 69 हजार रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड विमानतळासाठी 221 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कराड शहरालगत चौपदरी रस्त्यांचे जाळे, भूकंप संशोधन केंद्र, आरटीओ ऑफिस या लक्षवेधी कामांच्या माध्यमातून आ. चव्हाण यांनी सुमारे 2 हजार कोटीपर्यंतचा निधी आणला आहे, तर नुकताच विमानतळासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कराडच्या विकासासाठी आणखी उपयुक्त ठरणार आहे.

अतुल भोसले, पृथ्वीराज पाटील यांच्यात कांटे की टक्कर  

कराड दक्षिण मतदारसंघात कराड शहराचा समावेश असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निधीचा पाऊस कराड दक्षिण मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि डाॅ. अतुल भोसले यांच्यात लढत ही अटीतटीची होत असते. आता विकासकामांतही 'हम किसीसे कम नही' म्हणत दोन्ही नेत्यांकडून विकासकामांचा डोंगर उभा केला जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळणार असे दिसत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

pruthviraj Chavhan, atul bhosle
Ajit Pawar CM : पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी शंभूराज देसाईंच्या जिव्हारी; म्हणाले, "बाबांना 'वाण नाही पण..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com