Ajit Pawar CM : पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी शंभूराज देसाईंच्या जिव्हारी; म्हणाले, "बाबांना 'वाण नाही पण..."

Prithviraj Chavan On Ajit Pawar : निधीवाटपानंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या संशयाचे वातावरणाकडे चव्हणांनी लक्ष द्यावे
Shambhuraj Desai, Sanjay Raut, Prithwiraj Chavan
Shambhuraj Desai, Sanjay Raut, Prithwiraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan Vs Shambhuraj Desai : राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे हदरे काही केल्या संपायचे नाव घेताना दिसत नाहीत. यात दिवसेंदिवस अनेक चर्चांची भर पडून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही झटके बसताना दिसत आहेत. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी चव्हाणांना संजय राऊतांचा गुण लागल्याचा टोला लगावला आहे. चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्री बदलाची केलेली भविष्यवाणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह आमदारांना विशेषतः शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागण्याचे दिसून येत आहे. यावर भाजप-शिंदे गट आणि काँग्रेस असा कलगीतुरा रंगणार आहे. (Latest Political News)

Shambhuraj Desai, Sanjay Raut, Prithwiraj Chavan
MLA Fund Distribution : २५-२५ कोटी काय घेऊन बसलाय; अजितदादांनी शंभर कोटी वाटले !

संजय राऊतांच्या संगतीत राहून चव्हाण यांना वाण नाही पण गुण लागल्याची टीका देसाई यांनी केली आहे. चव्हाणांच्या भविष्यवाणीवर देसाई म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण नजीकच्या काळात संजय राऊतांना भेटलेले दिसतायत. त्यांची कुठेतरी भेट झाली असेल. वाण नाही पण गुण लागतो तशी चव्हणांना राऊतांची सवय लागली. संजय राऊत जसे उठताना, बसताना, सकाळी, दुपारी, संध्याकाळी हे सरकाळ जाणार-जाणार म्हणतात, तसेच आता चव्हाण बोलले आहेत."

दुसऱ्यांच्या घरात वाकून पाहण्यापेक्षा आपल्या घरात काय सुरू आहे, याकडे लक्ष देण्याचा सल्लाही देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी दिला आहे. कोण, कधी मुख्यमंत्री होणार यावर बोलण्यापेक्षा काँग्रेसमधील जास्त निधी मिळालेल्या आमदारांकडे इतर आमदार संशयाने पाहायला लागले आहेत, याकडे चव्हाण यांनी लक्ष द्यावे. आमच्या घरात वाकून पाहण्यापेक्षा त्यांनी आपल्या पक्षातील आमदारांकडे लक्ष द्यावे. आमच्या अपात्रतेबाबत कायद्याने, नियमाप्रमाणे जे व्हायचे ते होईल, ते आम्हाला मान्य असेल. त्यामुळे चव्हाणांनी राऊतांच्या संगतीत राहून भविष्य वर्तवण्याचे नवीन काम करू नये", असाही देसाईंनी चव्हाणांना सुनावलं आहे.

Shambhuraj Desai, Sanjay Raut, Prithwiraj Chavan
Parliament Monsoon Session : गांधींच्या पुतळ्याजवळ खासदारांनी रात्र काढली जागून ; मोदींच्या विरोधात काँग्रेस, आप आक्रमक

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?

मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यास तयार नसल्याने भाजपने आता अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा चव्हाणांनी ठोकला. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी अजितदादांना मुख्यमंत्री केले जाईल. शिवसेनेचे १६ आमदार येत्या १० ऑगस्टला विधानसभेचे अध्यक्ष अपात्र करतील. त्याचवेळी अजित पवारांना मुख्यमंत्री करतील. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येईल. "

चव्हणांच्या या विधानाने राज्यात खळबळ उडाली आहे. यावर पुढे येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे हेच कायम राहणार आहेत. तशी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतही चर्चा झाली होती, असा खुलासा करावा लागला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com