Karad Nagar Parishad : भाजपचा वारू रोखण्यासाठी कराडमध्ये वेगळाच प्लॅन शिजतोय; राष्ट्रवादी अन् शिवसेनाही देणार साथ?

Karad Nagar Parishad : कराड पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांनी भाजपचा वारू रोखण्यासाठी स्थानिक आघाडी तयार करण्याचे संकेत दिले आहेत.
Political leaders from BJP, Congress, NCP, and Shiv Sena discussing alliance strategies to counter BJP’s growing dominance in Karad Municipal Election 2025.
Political leaders from BJP, Congress, NCP, and Shiv Sena discussing alliance strategies to counter BJP’s growing dominance in Karad Municipal Election 2025.Sarkarnama
Published on
Updated on

Karad Nagar Parishad : कराड नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात भाजपने धक्का तंत्राचा वापर करत निम्मी काँग्रेस खालसा केल्याने भाजपचा वारू रोखण्यासाठी काँग्रेससह स्थानिक आघाड्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेसकडून निवडणुका लढविण्याची रणनीती आखण्यासाठी चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्यासोबत असू शकतो, तशा हालचालीही वाढल्या आहेत.

दुसरीकडे शिवसेनेकडून पालिकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांनी नगराध्यक्षपदावर दावा करत पॅनेलची तयारी सुरू केली आहे. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पाठिंबा असेल, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने परस्पर तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्यांच्या भूमिका स्पष्ट होतील.

स्थानिक आघाड्यांकडेही लक्ष

पक्षविरहित सर्वसमावेशक आघाडी होणार का? असा प्रश्न निवडणुकीत उभा राहात आहे. भाजप पक्षाच्या चिन्हावर आल्यास स्थानिक लोकशाही आघाडी काय करणार? याकडे लक्ष लागून आहे. काँग्रेस आघाड्यांसमवेत राहणार, की पक्षाच्या चिन्हावर? हे ही स्पष्ट झालेले नाही. भाजपसह माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांनी शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे जाहीर केले आहे, तरीही त्यांच्या आघाडीचे अस्तित्वही कायम असल्याने त्यांच्या हालचालीवर सर्वांचे लक्ष आहे. राजकीय समन्वय काय असेल, ते लवकरच समोर येईल.

Political leaders from BJP, Congress, NCP, and Shiv Sena discussing alliance strategies to counter BJP’s growing dominance in Karad Municipal Election 2025.
Satara Nagar parishad Election : शिवेंद्रराजे-उदयनराजेंची 'ऐतिहासिक' युती घोषणेपूर्वीच संकटात; नगराध्यक्षपदामुळे 'गेम' बदलणार?

माजी मंत्री पाटील यांची लोकशाही आघाडी नेहमीप्रमाणे सर्वसमावेशक निवडणुकीला जाणार की, ते कोणाबरोबर आघाडी करणार? याचीही उत्सुकता आहे. त्या मुद्द्यावर काँग्रेस देखील सकारात्मक राहिल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री पाटील एकत्र येतील, असे संकेत आहेत.

नगराध्यक्षपदाच्या चेहऱ्याची उत्सुकता :

कऱ्हाडचे नगराध्यक्षपद खुले आहे. त्यातूनही नागरिकांतून निवड होणार आहे. त्यामुळे तेथे चुरस आहे. मात्र, नवा चेहरा देण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण? याची चर्चा केलेली नाही, तरी भाजपमध्ये दाखल झालेल्या शारदा जाधव, अरुण जाधव यांच्यासह माजी नगरसेवक विनायक पावसकर, अतुल शिंदे, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, सुहास जगताप यांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेनेचे राजेंद्र यादव यांनीही नगराध्यक्षपदासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यांचे कार्यकर्त्यांसह समर्थकांकडून लॉचिंग होत आहे. यादव यांची स्वतंत्र आघाडी आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ते असतील, असेच सध्याचे वातावरण आहे. लोकशाही आघाडीनेही नगराध्यक्षपद लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्याकडूनही एक नाव पुढे येऊ शकते. त्यात सौरभ पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

Political leaders from BJP, Congress, NCP, and Shiv Sena discussing alliance strategies to counter BJP’s growing dominance in Karad Municipal Election 2025.
Satara Politic's : मकरंद पाटलांकडून शशिकांत शिंदेंना धोबीपछाड; जिल्हाध्यक्षांसह दोन बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

याउलट कॉँग्रेसची बिकट स्थिती आहे. माजी शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांचे नाव चर्चेत असले, तरी त्याची खात्री अद्यापही नाही. गेल्या २०१६ च्या निवडणुकीप्रमाणे एमआयएमची एन्ट्री झाल्यास माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार उमेदवार असू शकतात. सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना शिंदे गटाचे रणजित पाटील हेही नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांत आहेत.

भाजप स्वबळावर ?

पालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्याने भाजप स्वबळावर लढणार आहे. जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. भोसले यांनी नुकतीच तशी घोषणाही केली. भाजप अंदाज घेत असली, तरी त्यांची रणनीती निश्चित आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही राबवली आहे. भाजपकडून इच्छुकांशी संपर्क साधला जात आहे. बैठका, थेट भेटीवर त्यांचे काम सुरू आहे. पक्षीय पातळीवर होणाऱ्या अनेक गोष्टी राजकीय पटलावर गांभीर्याने घेतले जात आहेत. त्यातूनच भाजपमध्ये पक्षप्रवेशही सुरू आहेत.

भाजपवासींमुळे उलाढाल

आमदार अतुल भोसले यांच्या मध्यस्थीने शहरातील अनेकांचे भाजप प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या. भाजपची रणनीती निश्चित झाली आहे. स्थानिक आघाड्यांना आव्हान निर्माण झाल्याने त्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्थानिक आघाड्यांसोबत जाण्याची चिन्हे आहेत. आघाड्यांनी सावध पवित्रा घेतल्याने काँग्रेससह माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची स्थानिक लोकशाही आघाडी सक्रिय झाली. शिवसेनेकडून माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांनी स्वतंत्र तयारी सुरू केली असली, तरी त्यांच्या यशवंत विकास आघाडीचे अस्तित्व कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com