Karad NCP News: कराड उत्तरच्या कामांवरील स्थगिती उठेना; बाळासाहेब पाटील अवमान याचिका दाखल करणार

Balasaheb Patil News: कराडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
Eknath Shinde, Balasaheb Patil
Eknath Shinde, Balasaheb Patilsarkarnama
Published on
Updated on

Karad Political News: महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब पाटील हे सातारचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री म्हणून काम पाहात होते. त्यावेळी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी ७९ कोटींची विकासकामे मंजूर केली होती. या कामांना शिंदे, फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती उठवली. मात्र, तरीही ५९ कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती राज्य शासनाने अद्याप उठवलेली नाही. त्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहेत.

कराडमध्ये राष्ट्रवादीचे Karad NCP आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. बाळासाहेब पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी ७९ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली होती. या कामांना नंतर आलेल्या सरकारने स्थगिती दिली होती.

त्यामुळे या कामाबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेनंतर उच्च न्यायालयाने या ७९ कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती उठवली. उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर २५/१५ इतर ग्रामीण विकास योजनेंतर्गत आठ कोटी, बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणे योजनेंतर्गत एक कोटी आठ लाख रुपये.

तसेच रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत एक कोटी १० लाख, जलसंधारण महामंडळाकडील छोटे सिंचन बंधारे योजनेंतर्गत चार कोटी अशी १५ कोटी रुपयांची विकासकामे सुरू होणार आहेत.

मात्र, अल्पसंख्याकबहुल विकास योजना, अर्थसंकल्प योजना मार्च २०२२, जलसंधारणेचे मोठे साठवण बंधारे व नगर विकास विभाग आदींच्या कामांवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली. तरीही शासनाने अद्याप याबाबत कार्यवाही केलेली नाही. त्याची प्रक्रिया शासनाकडून वेगाने व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे.

Eknath Shinde, Balasaheb Patil
Satara News : शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात आणणार : शिवेंद्रराजे

साखर कारखान्याबाबत संभ्रम

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री साखर आयुक्त, त्या-त्या विभागांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत मंत्री समितीची बैठक हंगामापूर्वी घेतली जाते, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, त्या बैठकीत हंगाम सुरू करणे, कारखान्यांना बॅंकाकडून उचल कशी देण्यात येणार, कपाती कोणत्या प्रकारच्या किती असणार व अन्य माहिती दिली जाते.

त्यामध्ये एक धोरण ठरवून त्यानंतर राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाते. सध्या सप्टेंबर महिना संपत आला तरीही मंत्री समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे साखर कारखाने सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.’’

Edited By Umesh Bambare

Eknath Shinde, Balasaheb Patil
INDIA Mumbai Meet : 'इंडिया'च्या बैठकीत पाच समित्यांची स्थापना ; कुठल्या समितीत कुणाची वर्णी लागली ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com