Bhandara Blast : वरठीच्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले; नागपुरात उपचार

Warthi Village : पहाटे सव्वा तीन वाजताची घटना; कंपनीच्या साहित्याचेही मोठे नुकसान
SunFlag Company Bhandara.
SunFlag Company Bhandara.Sarkarnama
Published on
Updated on

Sunflag Company : भंडारा शहराजवळील वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनीत मंगळवारी (ता. 2) पहाटे 03.15 वाजता स्फोट झाला. या स्फोटात तीन श्रमिक जखमी झालेत. जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले.

घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या आणखी आठ श्रमिकांनाही दुखापत झाले आहे. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही घटना घडली. घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाल्याचे श्रमिकांनी सांगितले. भागात कार्यरत तीन श्रमिक यात भाजले आहेत. तंत्रज्ज्ञ नामदेव झंझाड, अभियंता सागर जमने व कंत्राटी कामगार हटवार यांचा जखमीत समावेश आहे. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. स्फोट एवढा भयानक होता की, कंपनीतील जवळपास असलेला परिसर हादरला. या अपघातात कंपनीतील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

SunFlag Company Bhandara.
Bhandara : साहेब, कधी संपेल हो आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रशासकराज?

आम्ही जखमी श्रमिकांनी तातडीने प्रथमोपचार उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्यातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी श्रमिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा व उपचार मिळावे, यासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप स्फोटाबाबत अनिश्चितता कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे कंपनीचे नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी जुळविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचा आकडा सांगता येणार नाही, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे सोलर कंपनीत कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात नऊ श्रमिकांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की, मरण पावलेल्या श्रमिकांचे पार्थिवही मिळाले नव्हते. हाती आलेल्या शरीराच्या काही अवयवांवर मृतकांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करावे लागले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर जिल्ह्यातील या स्फोटाच्या घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. अलीकडच्या काळात झालेल्या स्फोटाची ही घटना ताजी असतानाच भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे घडलेल्या घटनेमुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड तर केली जात नाही ना, असा प्रश्न या दोन घटनांच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

SunFlag Company Bhandara.
Bhandara : थँक्स..! अदितीताई तटकरे.... तुम्ही आल्या आणि आमच्यासाठी....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com