Rohit Pawar vs Ram Shinde : कर्जत बाजार समिती: राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का

Karjat-Jamkhed : कर्जत जामखेडच्या राजकारणात खळबळ
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karjat APMC News : राज्यातील सत्ता बदलानंतर स्थानिक पातळीवरील राजकारणातही अनेक बदला होताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील जिल्हा, तालुका पातळीवरील अनेक नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. अशा वातावरणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. ऐन निवडणुकीत महत्वाची मंडळी सोडून जात असल्याने सत्ताधारी आणि विरोधाकांना या निवडणुकीत धक्के बसत आहेत. असाच धक्का कर्जत बाजार समितीत माजी आमदार राम शिंदे यांनी विद्यामान आमदार रोहित पवारांना दिला आहे.

Rohit Pawar
Chandrapur Loksabha : तेव्हा ‘दारू विरुद्ध दूध’च्या मुकाबल्यात दारूचा झाला होता विजय, पण आता...

कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यातील चुरस सर्वश्रृत आहे. आता या मतसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून माजी आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी आमदार पवार यांना मोठा झटका दिला आहे. शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकिर यांना आपल्या पॅनेलकडून उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देऊन शिंदे यांनी कर्जत-जामखेडच्या राजकाराणत भूकंप घडविल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar
BRS Rally News : तेलंगणा माॅडेलचा प्रचार सुरू, जागोजागी पोस्टर आणि मतदारसंघात वाहने..

कर्जत बाजार समिती (Karjat APMC) निवडणुकीसाठी माजी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. या पॅनेलच्या उमेदवारांची शिंदे यांनी नावे जाहिर केली आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर (Kakasaheb Tapkir) यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांनी काकासाहेब तापकिर यांना सोसायटी मतदारसंघ (सर्वसाधारण) या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर काकासाहेब तापकिर राजकारणात पक्षीय निवडणूक नसते, असे म्हणाले आहेत. तापकिर यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकेचा आमदार रोहित पवारांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com