करुणा मुंडेंचे अस्त्र त्यांच्यावर उलटले : कार्यकर्त्याकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

करुणा मुंडे ( Karuna Munde ) यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच कार्यकर्त्यावर फसवणुकाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात वेगळेच बाब समोर आली आहे.
Karuna Sharma Latest News
Karuna Sharma Latest NewsSarkarnama

Karuna Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे ( Karuna Munde ) यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच कार्यकर्त्यावर फसवणुकाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात वेगळेच बाब समोर आली आहे. त्यामुळे करुणा मुंडेंचे अस्त्र त्यांच्यावर उलटल्याची चर्चा आहे. नवीन पक्ष काढण्यासाठी रोख व सोन्याच्या स्वरुपात दिलेल्या सुमारे 34 लाख 45 हजार रुपयांची परतफेड न केल्याच्या फिर्यादीवरुन करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, करुणा मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत संभाजी भोसले ( वय 40 ) रा. कोंची, ता. संगमनेर यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 26 ऑगस्ट रोजी 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्यावरील आरोप खोटा असून आपलीच फसवणूक झाल्याचे सांगत भोसले यांनी 20 ऑगस्ट रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊनही, तत्कालिन पोलिस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे भोसले यांनी सबळ पुराव्यांसह पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. त्यानंतर शनिवार ( ता. 3 ) च्या रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karuna Sharma Latest News
करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांना चुना : तीन जणांवर गुन्हा दाखल

फिर्यादीत म्हटले आहे, पक्ष काढण्यासाठी व बांधणीकरीता आपण करुणा मुंडे यांना 4 लाख रुपये रोख स्वरुपात दिले. त्यानंतर त्यांनी मागितलेल्या ३६ लाख रुपयांच्या पूर्ततेसाठी स्वतःसह मित्र बालम शेख यांचे असे 24 तोळे सोने दिले. पक्षाची नोंदणी होवून पैसे जमा झाल्यानंतर पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतरही पैशांची मागणी केल्याने, मी तसेच माझा मित्र बालम शेख, भाऊ अमोल भोसले, पत्नी राणी भोसले यांचे बँक खात्यातून आरटीजीएस प्रणालीद्वारे 11 ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत करुणा मुंडे यांच्या एचडीएफसी खात्यावर 18 लाख 45 हजार रुपये पाठवले. अशा प्रकारे एकूण 22 लाख 45 हजार रुपये व 12 लाख रुपयांचे सोने असा सुमारे 34 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज परत करण्याच्या बोलीवर घेतला आहे. परंतु करुणा मुंडे यांनी 40 लाख रुपये पूर्ण जमा न झाल्याने माझ्या ओळखीचे विद्या संतोष अभंग व इतर तीन यांच्या नावावर असलेला, बाराशे चौरशे फुटांचा घुलेवाडी येथील बंगला हा पक्षाचे कार्यालय म्हणुन दाखविण्यासाठी साठेखत दस्त करुन नोंदवुन घेतला व त्यात 9 लाख 10 हजार रुपये घेतल्याचे दाखविले. या पैकी 5 लाख रुपये मुंडे यांना अभंग यांनी 11 फेब्रुवारी रोजी परत दिले. व उर्वरित रक्कम रोख स्वरुपात परत केली.

Karuna Sharma Latest News
'कोल्हापूर उत्तर' : करुणा मुंडे यांना ६१ मत; निवडणूक रद्द करण्याची मागणी

त्यानंतर करुणा मुंडे यांनी पक्ष नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन न केल्याने, पैशांची मागणी केली असता, त्यांनी टाळाटाळ केल्यामुळे त्या आपली फसवणूक करीत असल्याची खात्री पटली. मी या प्रकरणी पोलिस अधीक्षकांकडे गेल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन व्हॉटसअपवर पाठवलेल्या व्हाईस मेसेजमध्ये मैं अजय देडे को भेज के तुमको खत्म करुगी अशी धमकी दिली व लगेच थोड्यावेळाने तो व्हॉईस मेसेज डिलीट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकीता महाले करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com