P N Patil Passes Away : मृत्यूशी झुंज संपली, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांची प्राणज्योत मालवली

P N Patil Death News : आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने राज्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
PN Patil
PN Patil Sarkarnama

Kolhapur P N Patil Latest News, 23 May : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत आमदार म्हणून ओळख असणारे आमदार पी. एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर (P N Patil Passed Away) संपली. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राजारामपुरी येथे राहत्या घरी चक्कर येऊन कोसळल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. युद्धपातळीवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी सहा वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने राज्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून पी. एन. पाटील यांचा राज्यातील राजकारणात वावर होता. त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये (Congress) पोकळी निर्माण झाली असून कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटील यांच्या अचानक झाल्याने विधानसभा मतदारसंघ पोरका झाला आहे. रुग्णालयाच्या दारात कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहूल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे. अंत्यविधी सडोली खालसा येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com