Satara News : कास अनाधिकृत बांधकामे : हरित न्यायाधिकरणांचे जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश...

Illegal constructions बेकायदेशीर बांधकामामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून ही बांधकामे लवकरात लवकर पाडली पाहिजेत, अशी मागणी ॲड. असीम सरोदे यांनी केली.
Satara Collector Ruchesh Jaivanshi
Satara Collector Ruchesh Jaivanshisarkarnama

Satara News : कास पठारावरील केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याकामी हरित न्यायाधिकरणांकडे दाखल केलेली याचिका सुनावणीस आली असता, ही बांधकामे पाडण्याच्या मागणीवर चार आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे, असे आदेश हरित न्यायाधिकरणाने दिले असल्याची माहिती, याचिकाकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

कासपठार Kaas Platue परिसर हा जैववैविधतेने नटलेला आहे, ही निसर्गसंपदा जोपासण्याचेकाम सर्वांचे असताना हा निसर्गरम्य प्रदेश उध्वदस्त करण्याची अनिती स्थानिक राजकारणी, भ्रष्टाचार करणाऱ्यांनी सुरु केली आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी आणि राखीव वनक्षेत्रामध्ये बांधकामाला परवानगी नसताना येथे असलेली बांधकामे अधिकृत करण्याबाबत जो प्रयत्न सुरु आहे त्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायधिकरणामध्ये National Green Tribunal सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या पुढाकाराने याचिका दाखल केली होती.

या याचिकेमध्ये जिल्हाधिकारी, प्रदूषण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल मंडळ यांनाप्रतिवादी करण्यात आले आहे. तसेच या कासपठार परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी, निसर्गसंपदा, जैवविविधता टिकली पाहिजे यासाठी ही याचिका ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल केल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.

Satara Collector Ruchesh Jaivanshi
Satara News : नवउद्योजकांना ५५० कोटींचे अनुदान; युवकांनी रोजगार देणारे बनावे : उदय सामंत

कास पठारावरील १०० बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई करावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. या केसवर दि. १७ एप्रिल २०२३ रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली. या याचिकेची सुनावणी न्यायाधीश दिनेशकुमार सिंग, न्यायिक तज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्यासमोर झाली. बेकायदेशीर बांधकामामुळे पर्यावरणाला धोका निर्माण असून ही बेकायदेशीर बांधकामे लवकरात लवकर पाडली पाहिजेत, अशी मागणी ॲड.असीम सरोदे यांनी केली.

Satara Collector Ruchesh Jaivanshi
Udayanraje Bhosle : उदयनराजेंनी पालिका प्रशासनास फटकारले; म्हणाले, "अशुद्ध पाणीपुरवठा..."

यावर हरित न्यायाधिकरणाने जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल यांना नोटीस पाठवण्याचा आदेश दिला आहे. या नोटीसला चार आठवड्यामध्ये प्रतिवादींनी आपले लेखी म्हणणे सादर करावे असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांच्या या आदेशामुळे चार आठवड्यात बांधकामे पाडण्याकामी प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल हे स्पष्ट झाले आहे.

Satara Collector Ruchesh Jaivanshi
Jayant Patil यांच्या कारवाईवर Devendra Fadanvis म्हणाले | BJP | NCP | Sarkarnama Video

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com