Kavthemahankal Nagar Panchayat : राष्ट्रवादीचे टेन्शन वाढलं; कवठेमहांकाळमध्ये चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर, रोहित पाटलांना धक्का...

NCP News : राष्ट्रवादीतील युवा नेते रोहित पाटील यांना धक्का देणारे सध्याचे वातावरण आहे.
Kavthemahankal Nagar Panchayat
Kavthemahankal Nagar Panchayat Sarkarnama
Published on
Updated on

Sangli : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक थेट भाजप खासदारांच्या संपर्कात असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील युवा नेते रोहित पाटील यांना धक्का देणारे सध्याचे वातावरण आहे.

Kavthemahankal Nagar Panchayat
Rohit Pawar News : 'मला अजितदादा व्हायचं नाही...'; रोहित पवारांनी सुनील तटकरेंना फटकारले...

राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या गटाच्या जयश्री गावडे यांना नगराध्यक्षा केल्यापासून कवठेमहांकाळच्या राष्ट्रवादीत नेमके काय चाललंय हेच कळायला मार्ग नाही. कवठेमहांकाळमध्ये सध्या राष्ट्रवादीत आउटगोइंग, भाजपत इन्कमिंगची चर्चा जोर धरू लागली आहे.

लवकरच चार नगरसेवकांचा भाजप प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित होणार असल्याची चर्चा आहे. भाजपने कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर आणखी चार नगरसेवकांना खासदार पाटील यांच्या संपर्कात असल्याने राष्ट्रवादीचे टेन्शन वाढलं आहे.

Kavthemahankal Nagar Panchayat
Women Reservation Bill : महिला आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, "ओबीसींची एवढी बाजू घेता तर..."

चारपैकी एक नगरसेवक जाहीरपणे खासदारांचा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असून, मोबाईल स्टेस्टसवर ही खासदारांचा उदो उदो सुरू असल्याचे पाहायला मिळते. उर्वरित तीन नगरसेवक गोपनीय माहिती ठेवून भाजप खासदारांच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांच्या प्रवेशाची तारीख ठरणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Kavthemahankal Nagar Panchayat
Rohit Pawar News : शरद पवारांना डिवचल्यावर काय होतं हे त्यांना समजेल; रोहित पवारांनी भाजपला सुनावले खडेबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com