Khatav NCP News : खटाव राष्ट्रवादीचा अजितदादांना पाठिंबा; कार्यकर्त्यांनी घेतली मुंबईत भेट

Nandkumar More खटाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष युवानेते नंदकुमार मोरे यांनी तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या भावना, मते जाणून घेतली.
Nandkumar More and supporter with Ajit Pawar
Nandkumar More and supporter with Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

-संजय जगताप

Khatav NCP News : शरद पवार आणि अजितदादा दोघेही आमच्यासाठी पुजनीय आहेत. मात्र, खटाव तालुक्यातील बहुतांशी कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करून आपण अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची माहिती खटाव तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी दिली.

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी कार्यकर्ते सैरभैर झाले. पवार साहेबांच्या Sharad Pawar मागे भक्कमपणे उभे राहायचे की अजितदादांची Ajit Pawar पाठराखण करायची. या विचाराने सर्वजण अस्वस्थ झाले होते. त्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका राष्ट्रवादीचे Khatav NCP अध्यक्ष युवानेते नंदकुमार मोरे यांनी तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या भावना, मते जाणून घेतली.

त्याबाबत श्री. मोरे म्हणाले, सन १९७८ पवार कुटुंबीयांचे व आमच्या मोरे परिवाराचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले आहेत. शरद पवार साहेब व अजितदादा हे दोघेही आमच्यासाठी पूजनीय आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभे राहायचे की अजितदादांची पाठराखण करायची. या विचाराने सर्वजण अस्वस्थ झाले होते.

मात्र, बहुतांशी कार्यकर्त्यांच्या भावनांचा व भविष्याचा विचार करता काहीतरी ठोस निर्णय होणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष या नात्याने सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. बहुतांशी कार्यकर्त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात नंदकुमार मोरे यांनी वडूज, औंध, पुसेगाव, खटाव, पुसेसावळी, निमसोड, मायणी या जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

Nandkumar More and supporter with Ajit Pawar
Ajit Pawar News : राजकीय भूकंपाचे धक्के शेंदोन्यापर्यंत, तरुणाने अजित पवारांना लिहिले रक्ताने पत्र !

त्याचप्रमाणे, तालुक्यातील ज्येष्ठ, बुजुर्ग कार्यकर्त्यांशी सुद्धा चर्चा केली आहे. याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांकडून अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काही कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात पाठिंब्याची निवेदने आपल्याकडे दिली आहेत. यथावकाश प्रत्येक कार्यकर्ता आपली भूमिका स्पष्ट करेलच. सर्वांच्या मताचा व भावनांचा विचार करून अजितदादा पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, स्वतः मोरे यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. तालुक्यातील विविध कामासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर खटाव तालुका राष्ट्रवादी अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

त्यावेळी त्यांचेसोबत जिल्हा बँकेचे माजी संचालक अर्जुन खाडे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बंडा गोडसे ,वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक श्रीकांत काळे, गिरीश गोडसे ,गणेश गोडसे ,संजय गोडसे, मनोज कुंभार ,प्रतीक बडेकर ,रणजीत गोडसे ,बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे, रवींद्र मोरे, सुभाष शितोळे ,अक्षय थोरवे, संजय खाडे, विलास खाडे ,रवींद्र पवार ,विष्णुपंत खाडे, मधुकर खाडे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .

Nandkumar More and supporter with Ajit Pawar
Rohit Pawar यांना वाटते 'ही' भीती, भाजप Ajit Pawar यांची कारकिर्द संपवून टाकेल | NCP Split | BJP

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com