Ajit Pawar News : राजकीय भूकंपाचे धक्के शेंदोन्यापर्यंत, तरुणाने अजित पवारांना लिहिले रक्ताने पत्र !

Sudhakarrao Naik : सुधाकरराव नाईक यांनी वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Indranil Naik, Pusad
Indranil Naik, PusadSarkarnama
Published on
Updated on

A letter written with blood to Ajit Pawar : पुरोगामी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेल्या नाईक घराण्याविषयी आस्था, आपुलकी व प्रेम असणारे अनेक समर्थक आजही कायम आहेत. हे तालुक्यातील शेंदोना या गावाच्या तरुणाने दाखवून दिले. स्वतःच्या रक्ताने आमदार इंद्रनील नाईक यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून तरुणाने हे सिद्ध केले. (A young man from the village of Shendona showed it)

दोन जुलैला मुंबईमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचे धक्के मानोरा तालुक्यातील शेंदोना या गावापर्यंत बसल्याचे या गावातील निशांत श्रीकांत राठोड यांच्या रक्ताने लिहिलेल्या पत्रावरून जाणवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून राज्याच्या विविध विभागातून तीसपेक्षा अधिक आमदारांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांना साथ दिली आहे.

अजित पवारांना साथ देणाऱ्यांमध्ये राज्याच्या राजकारणामधील मातब्बर असलेल्या नाईक घराण्यातील पुसद मतदार संघाचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांचासुद्धा समावेश आहे. आमदार नाईक यांचे मोठे वडील माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी राज्याच्या विकासामध्ये आपला मोलाचा वाटा उचललेला असल्याने नाईक घराण्याच्या चौथ्या पिढीला मंत्री मंडळामध्ये इंद्रनील नाईकांच्या रूपाने समाविष्ट करून घेण्याची आग्रही मागणी रक्ताद्वारे पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निशांत राठोड यांनी केल्याने शेंदोनाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये हा विषय कुतूहलाने चर्चिल्या जात आहे.

Indranil Naik, Pusad
Ajit Pawar News : अजितदादा आग्रही असलेल्या खात्याबाबत लवकरच निर्णय होणार ?

पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे सुतोवाच केले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये येत्या १० तारखेला विस्तार करण्याचे जवळपास निश्‍चित करण्यात आले आहे. शिंदे गटातील आमदार मंत्रि‍पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आलेल्या आठ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतलेली आहे. तेव्हापासून शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांची चलबिचल वाढलेली आहे. आधीच आठ आमदारांनी शपथ घेतल्यामुळे आगामी विस्तारात अजित पवारांसोबतच्या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

नाईक घराण्याचे राजकारणातील (Politics) योगदान बघता इंद्रनील नाईकांचा विचार केला जाईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. निशांत राठोड याची मागणी पूर्ण होणार की नाही, हे लवकरच कळणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com