Ajit Navale ON Milk Prices : आदेश नको, कायदा करा ; दूध दराबाबत सरकारच्या निर्णयावर किसान सभा संतप्त

Radhakrishna Vikhe Patil : खासगी कंपन्या अशा सरकारी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावतात..
Ajit Navale, Radhakrishna Vikhe Patil :
Ajit Navale, Radhakrishna Vikhe Patil :Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : दूध दराबाबत सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकासमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. पण किसान सभा यावर नाराज आहे.

"महाराष्ट्र सरकारने असे निर्देश पाळणारा कायदा करावा, अन्यथा दुधसंघ, खासगी कंपन्या अशा सरकारी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावतात," असे मत किसान सभेचे आहे. दुधाला किमान 35 रुपये प्रतिलिटर भाव देण्याची मागणी यापूर्वीच केल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ.अजित नवले यांनी सांगितले आहे.

एकीकडे लम्पी साथरोग आजाराने दुधाचे उत्पादन घटल्याचे सांगत दुग्धपदार्थ आयात करावे, असे केंद्रीय मंत्री म्हणतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील दूध कंपन्या राज्यात दुधाचा महापूर आल्याची आवई उठवत दुधाचे दर 38 रुपयांवरून 31 रुपये प्रतिलिटर पर्यंत खाली आणतात हा विरोधाभास असल्याचे अजित नवले यांनी सांगितले.

Ajit Navale, Radhakrishna Vikhe Patil :
Dhananjay Munde Birthday Today : बळीराजा चिंतेत, संकटात, मग माझा वाढदिवस कशाला ? कृषीमंत्री मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाले..

आता सरकारने दूध उत्पादक शेतकरी आणि किसान सभा आदी संघटनांच्या दबावापुढे गाईच्या दुधाला प्रति लिटर 34 रुपये भाव देण्याचे निर्देश शासकीय आणि खाजगी कंपन्यांना दिले आहेत. खाजगी, शासकीय कंपन्या संगनमत करून दुधाचे भाव पाडतात. तसेच शासनाचे निर्देश निघाले तरी त्याला कारणे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता याबाबत शासनाचे निर्देश पाळणारा कायदा करावा अशी मागणी नवले यांची आहे. जो पर्यंत कायदा होत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळणार नाही असे ते म्हणाले.

Ajit Navale, Radhakrishna Vikhe Patil :
Maratha reservation : आरक्षणासाठी मराठा महासंघाचा पुन्हा एल्गार ; 'जंतरमंतर' वर आंदोलन..

सरकारच्या आदेशानुसार विखे यांनी राज्‍यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्‍या प्रतिनिधींची बैठक घेऊन समिती स्थापन केली होती. या समितीने ३४ रुपये दर देण्‍याची शिफारस केली. त्‍यानुसार राज्‍य सरकारने आता गाईच्‍या दूधाकरीता किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्‍याचा आदेश काढला आहे. याची अंमलबजावणी करण्‍याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com