Kolhapur News : आमदार निधीवरून सतेज पाटील भडकले; म्हणाले, 'सत्तारूढ...'

Hasan Mushrif : काँग्रेसच्या सहा आमदारांना केवळ 10 टक्के निधी, हसन मुश्रीफांविषयी नाराजी...
Hasan mushrif-Satej Patil
Hasan mushrif-Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Congress MLA : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात येणार्‍या निधीमध्ये काँग्रेसच्या आमदारांना बेदखल केले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असताना त्यांना आतापर्यंत केवळ 10 टक्के टक्के निधी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यावरून काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार असताना त्यांना विकासकामांसाठी एकूण निधीच्या फक्त 10 टक्के निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हाला निवडून देणार्‍यांनी घोडं मारलं आहे काय? अशी विचारणा आता हे आमदार (MLA) करत आहेत. या एकूण निधीच्या प्रत्येकी 27 टक्के निधी हा भाजपा, शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आणि राष्ट्रवादी (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांना किंवा नेत्यांनी सुचवलेल्या कामांना मिळणार असून 9 टक्के निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अधिकारात राखीव ठेवण्यात आला आहे.

Hasan mushrif-Satej Patil
Ram Mandir : निमंत्रणाच्या वादावर अखेर मुख्य पुजारीच बोलले; उद्धव ठाकरे, राऊतांवर संतापले

'सत्तारूढ निधी वितरण समिती'

निधी देत नसल्याने काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांना केवळ दहा टक्के निधी देणे हे जनतेच्या विरोधातील धोरण आहे. महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारने राज्यभरातील जिल्हा नियोजन समित्यांचे नाव बदलून आता 'सत्तारूढ निधी वितरण समिती' असे नाव ठेवावे, असा हल्ला पाटील यांनी सरकारवर चढवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ताधारी म्हणून 5-10 टक्के निधी जादा घेणे समजू शकतो. परंतु, सहा आमदारांना फक्त 10 टक्के निधी हे केवळ आणि केवळ दुर्दैवी आहे. याबाबत पालकमंत्र्यांना सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. तसेच 8 जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

Hasan mushrif-Satej Patil
Madha Lok Sabha: निंबाळकर की मोहिते पाटील? फडणवीस सोडवणार माढ्याचा तिढा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com