Kolhapur Lok Sabha Congress : कोल्हापुरातील दोन पाटलांची 'अशी ही टोलवाटोलवी'; काँग्रेसपुढे उमेदवाराचा पेच !

Satej Patil And P. N. Patil : काँग्रेसपुढील उमेदवाराच्या पेचाच भाजपला फायदा होणार
Satej Patil, P. N. Patil
Satej Patil, P. N. PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आपल्या बाजूने वातावरण निर्माण झाल्याचे सांगत काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र या मतदारसंघातून उमेदवार कोण, असा मोठा प्रश्न मतदारांसह पक्षश्रेष्ठींपुढे पडला आहे. कारण या लोकसभा मतदारसंघातून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील खासदारकी नको रे बाबा म्हणत टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहेत. याचा प्रत्यय दोन वेळा आल्याने विरोधकांना फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चा आहे. (Latest Political News)

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पायाला भिंगरी बांधून केलेल्या भारत जोडो यात्रेस देशाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपवर सातत्याने प्रहार करत राहुल यांनी आपली चांगली प्रतिमा केली. गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने कोल्हापुरात एकीकडे काँग्रेससाठी पोषक वातावरण झाले असताना दुसरीकडे लोकसभेच्या उमेदवारीचे गाठोडे सुटताना दिसत नाही. लोकसभेला वर्षभर अवधी असला तरी जिल्ह्यातील काँग्रेस अजूनही संभ्रमावस्थेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर असलेले आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील याबाबत एकमेकांकडे बोट दाखवताना दिसत आहेत.

Satej Patil, P. N. Patil
Shishir Dharkar In Shivsena UBT : पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेले शिशिर धारकर ठाकरेंच्या सेनेत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसचे सर्वाधिक प्राबल्य आहे. काँग्रेसचे चार आमदार असून इतरत्र आमदार सतेज पाटील यांचा वेगळा गट कार्यरत आहे. मात्र, या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार? याचे उत्तर मात्र मिळालेले नाही. उमेदवारीचा विषय निघाला तर जिल्ह्यातील दोन मातब्बर आमदार एकमेकाकडे निर्देश करतात. गेल्या आठ दिवसांमध्ये दोनवेळा असे प्रसंग घडून आले ज्यात आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात टोलवाटोलवी करत असल्याचे दिसले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेते कन्हैयाकुमार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. या सभेत आमदार पी.एन.पाटील हिंदीत भाषण केले. त्यांच्या हिंदी भाषेचे कौतुक आमदार सतेज पाटील यांनी केले. पाटील हे चांगले हिंदी बोलतात. भविष्यात त्यांना चांगला उपयोग होईल. त्यात काय वेगळे सांगायची गरज नाही, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून चिमटा काढला हे लक्षात आल्यानंतर, तुमची हिंदी माझ्यापेक्षा चांगली असल्याचे सांगत पी.एन.पाटलांनी लोकसभेला सतेज पाटीलच योग्य असल्याचे सांगितले. कन्हैयाकुमार यांनीही ‘जो बढिया हिंदी बोलेगा, वो दिल्ली जायेगा’ असे वक्तव्य करत गुगली टाकली.

Satej Patil, P. N. Patil
Sharad Pawar In Kolhapur : येवला-बीडनतंर आता शरद पवारांचे मिशन कोल्हापूर; मुश्रीफांचं टेन्शन वाढणार ?

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे निरीक्षक पृथ्वीराज चव्हाण दौऱ्यावर आल्यानंतर सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी एकमेकांकडे बोट लोकसभेच्या रिंगणातून स्वत:ला बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण प्रकारानंतर पुन्हा एकदा लोकसभेची रिस्क कोणीही घ्यायला तयार नाही हे अधोरेखित झाले. या दोन्ही नेत्यांना आपल्या विजयाची खात्री नसावी. या संभ्रमाच्या वातावरणाचा फायदा विरोधकांना होणार, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com