Mahalaxmi Temple : कोल्हापुरात राडा! अंबाबाई मंदिर परिसरात खोदाई; नेमकं काय घडलं ?

Kolhapur Corporation : महापालिका प्रशासन, पोलिस आणि व्यावसायिकांत खडाजंगी
Mahalaxmi Temple Kolhapur
Mahalaxmi Temple KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News :

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मंगळवारी सकाळी राडा झाला. मंदिर परिसरातील खासगी चप्पल स्टँडचे अतिक्रमण काढताना व्यावसायिक विरुद्ध महापालिका प्रशासन आणि पोलिस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. मंदिराच्या कंपाउंडभोवती असणाऱ्या खासगी चप्पल स्टँडवरून महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई केली.

या वेळी या प्रशासनाला व्यावसायिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्टँड व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महापालिकेने थेट जेसीबी आणून हे स्टँड उद्ध्व्स्त केले. महापालिकेच्या या कारवाईने मात्र मंदिर परिसरातील वातावरण नवरात्राेत्सवाच्या पार्श्वभूमीवर तापले आहे. (Latest Political News),

Mahalaxmi Temple Kolhapur
Manoj Jarange Patil : आवाज मराठ्यांचा! मनोज जरांगेंची सभा होणार दीडशे एकरांत...

आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विविध उपाययोजना राबवण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा मंदिरात येणाऱ्या भक्तांना पुरेपूर सेवांचा लाभ मिळावा, यासाठी देवस्थान समितीचा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने अनेक बदल मंदिर परिसरात करण्यात आले आहेत.

मंदिरातील पश्चिम दरवाजा येथे देवस्थान समितीकडून भव्य चप्पल स्टँड उभारण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी आज कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंदिर परिसरात कारवाई केली. (Maharashtra Political News)

मंदिराच्या तटाभोवती असणाऱ्या जवळपास ३० पेक्षा जास्त खासगी चप्पल स्टँडवर कारवाई केली. ही कारवाई करताना मंदिर परिसरात मोठा राडा झाला. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या ठिकाणी चारीही दरवाजांच्या बाजूने हे खासगी चप्पल स्टँडधारक होते. त्यांच्यावर कारवाई झाल्याने कोल्हापूर महापालिका प्रशासनाला महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या वेळी प्रशासन आणि स्टँडधारक आमने-सामने आल्याने मोठा संघर्ष पाहायला मिळाला. परिणामी पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिका प्रशासनाने जेसीबी आणून मंदिराभोवती असणारी सर्व चप्पल स्टँड उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Mahalaxmi Temple Kolhapur
BJP Political News : आता खासदार होणार आमदार? राजस्थानसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com