Kolhapur Politics: ...तर महाडिक-पाटील का एकत्र येऊ शकत नाही? सतेज पाटलांच्या विधानाची चर्चा

Kolhapur District Bank News: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या राजकारणात अमल महाडिक आणि सतेज पाटील एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. सतेज पाटलांच्या विधानामुळे कोल्हापुरात राजकीय खळबळ उडाली आहे.
Kolhapur
KolhapurSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय कट्टर वैरी आमदार अमल महाडिक आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे एकमेकांना भेटतात. याला दोघेही नेत्यांनी दुजोरा दिल्यानंतर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या भूवय्या उंचावल्या होत्या.

Kolhapur
Chandrashekhar Bawankule News: आता फ्लॅटलाही मिळणार ‘सातबारा’सारखा पुरावा; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत महाडिक आणि पाटील का एकत्र येऊ शकत नाहीत का? असे विधान करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. माजी आमदार के पी पाटील यांनी काढलेल्या चिमट्यावर आमदार सतेज पाटील यांनी उत्तर दिले आहे.

कोल्हापूर बाजार समितीच्या विविध विषयावर चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँक येथे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार संजय घाटगे माजी आमदार के पी पाटील, राजेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्ह्यातील विविध राजकीय विषयावर नेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली.

Kolhapur
Maharashtra Teacher News: जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण अचानक पुढे ढकलले; शिक्षकांना मोठा दिलासा

माजी आमदार के पी पाटील यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांचा चिमटा काढण्यात आला. बंटी साहेब तुम्ही आणि महाडिक साहेब एकत्र येणार आहात अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. त्यातील खरे काय? त्यावर आमदार सतेज पाटील यांनी मिश्किलपणे के पी पाटील यांना टोला लगावला. जर तुम्ही आणि ए वाय पाटील एकत्र येत असाल तर महाडिक आणि पाटील यांना का नाही? असे विधान केले. आमदार पाटील यांच्या या वक्तव्यावर नेत्यांच्या भुवया उंचावल्या. त्यावर माजी आमदार के पी पाटील यांनी देखील केवळ आणि आमचे कधीच भांडण नाही आम्ही एकत्र आहोत, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com