KDCC Bank: हसन मुश्रीफांच्या विधानसभेतील तडजोडीने KDCC बँक पुरती गोत्यात : आधी लाखोंचा दंड, आता थेट चौकशी

Hasan Mushrif KDCC Bank controversy: कोल्हापूर जिल्हा बँकेतील आर्थिक, प्रशासकीय व कायदेशीर अनियमिततेप्रकरणी शासनाने चौकशीचे आदेश दिले. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा तापले असून महायुतीतील अंतर्गत मतभेदही चर्चेत आले.
KDCC Bank penalty and inquiry
KDCC Bank penalty and inquirySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur District Bank: पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा बँकेच्या चौकशी संदर्भात वारंवार भाजप नेत्यांकडून तक्रारी झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. पाठोपाठ कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचीही चौकशीची मागणी झाल्याने महायुतीतील घटक पक्षांचे राजकीय रंग दिसून आले.

भाजपने महायुतीतल्या घटक पक्षांना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना सहकार क्षेत्रात लक्ष करत असताना, आता कोल्हापूर जिल्हा बँकेकडे मोर्चा वळवला आहे. नुकतेच सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर अमृते यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

KDCC Bank penalty and inquiry
Rajabhau Waje : नाशिकमध्ये पीएम योजनांची प्रकरणे प्रलंबित, खासदार वाजे संतापले; बॅंक अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गोकुळवर प्रशासक नियुक्तीनंतर आता जिल्हा बँकेचीही चौकशी होणार आहे. जिल्हा बँकेच्या २०२३-२४ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालातील गंभीर आर्थिक, प्रशासकीय, नियामक व कायदेशीर अनियमिततेबाबत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश देण्याच आले आहेत.

गर्जना संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी लागली असून, संस्थांना दिलेल्या कर्जाच्या तपशिलावरही बोट ठेवण्यात आले आहे. वैधानिक लेखापरिक्षणातील प्रत्येक निरीक्षणाच्या पालन अहवालाची तपासणी करावी, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, नियमबाह्य कर्ज मंजुरीची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे. तसेच तारण, कर्ज दस्तऐवज नोंदीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत आणि आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करावी, अशा मागण्याही केल्या आहेत.

KDCC Bank penalty and inquiry
District Bank : सहकारातील घराणेशाही जोरात, परभणी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांची सुनेसाठी माघार!

नुकतेच कोल्हापूर जिल्हा बँकेला अन्नपूर्णा कंपनीला कर्ज दिल्याप्रकरणी भारतीय रिझर्व बँकेकडून सव्वा तेरा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रिझर्व बँकेकडून दंड ठोठावण्यात आल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्या राजकीय सोयीवर बोट ठेवण्यात आले होते, आणि चारच दिवसात बँकेच्या चौकशीचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com