District Bank : सहकारातील घराणेशाही जोरात, परभणी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांची सुनेसाठी माघार!

Marathwada Co-oprative Politics : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत घराणेशाही जोरात असल्याचे दिसून येत आहे.
Parbhani DCC Bank directors election; BJP MLA Tanaji Mutkule
Parbhani DCC Bank directors election; BJP MLA Tanaji Mutkulesarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचाच वचक असल्याचे दिसून आले आहे. 21 पैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आणत जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या जागा फिक्स केल्या आहेत. आता हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे.

मुटकुळे यांनी प्राथमिक कृषी पत पुरवठा वि.का. शे.स. संस्था, ता हिंगोलीमधून भरलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र ही माघार एखाद्या नव्या कार्यकर्त्यासाठी किंवा समर्थकासाठी नाही तर आपल्या सुनेसाठी त्यांनी घेतली आहे. आता त्यांच्या जागेवर त्यांच्या सुनबाई राजामतीबाई शिवाजीराव मुटकुळे ह्या निवडणूक लढवणार आहेत.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपचे नेते सुरेश वरपूडकर, नवनिर्वाचित शिवसेना आमदार सईद खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर, गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे या मातब्बरांनी आपापले संचालक पद आधीच बिनविरोध काढले आहे. बोर्डीकर यांच्या घरात तीन, तर वरपडूकर यांच्या घरात दोन संचालक पद गेली आहेत. तर शिवसेनेचे आमदार सईद खान यांच्यासह त्यांच्या भावाची जिल्हा बँकेच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. तसेच त्यांचे आणखी एक बंधु आरेफ खान हे पाथरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत.

Parbhani DCC Bank directors election; BJP MLA Tanaji Mutkule
Parbhani District Bank Election: परभणी जिल्हा बँकेत आमदार सईद खान यांची एन्ट्री, विद्यमान उपाध्यक्षाचा मुलगाही संचालक मंडळात!

जिल्हा बँकेच्या राजकारणात राजकारण आणू नये म्हणणाऱ्या पुढाऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांचीच गर्दी सहकाराच्या नावावर इथे झालेली दिसते आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांचा यात सहभाग आहे. अशावेळी भाजपचे आमदार तान्हाजी सखारामजी मुटकुळे यांनीही घराणेशाहीची परंपरा राखत सुनबाईसाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. 21 पैकी 13 संचालक बिनविरोध झाले असल्यामुळे आता उर्वरित 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

बँकेवर घोटाळ्याचा आरोप

परभणी जिल्हा बँकेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. बँकेच्या 103 शाखांमधून आतापर्यंत 82 कोटी 40 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सहकार विभागाकडे करण्यात आली आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी या घोटाळ्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले, की बँकेतील नोकर भरती, बेकायदेशीर कर्ज वाटप यांची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल.

Parbhani DCC Bank directors election; BJP MLA Tanaji Mutkule
Aurangabad district Bank : औरंगाबाद जिल्हा बँकेचा अध्यक्ष थेट CM फडणवीस ठरवणार? अब्दुल सत्तारांना दिलेला शब्द भाजप पाळणार का?

गैरव्यवहार सिद्ध झाल्यास RBI ला कळवून बँकेची परवानगी रद्द केली जाईल, तसेच या प्रकरणाची चौकशी पाच सदस्यीय समितीकडून करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे ज्या आमदार राजेश विटेकर यांनी बँकेच्या घोटाळ्याबद्दल विधानसभेत आवाज उठवला होता, ते या बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com