Kolhapur Election Result : कोल्हापुरात तब्बल 6 नगरपालिकांमध्ये सत्तांतर; काँग्रेससह ठाकरे, पवारांच्या पक्षाचा धुव्वा...

Congress UBT Shiv Sena NCP SP defeat : शिरोळमध्ये सत्तारूढ आमदार यड्रावकर-माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या विरोधात स्थानिक शिव-शाहू यादव आघाडीची मोट बांधली होती.
Kolhapur Election Result
Kolhapur Election Resultsarkarnama
Published on
Updated on

Congress setback Maharashtra : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि दोन मंत्र्यांसह ११ आमदार, माजी खासदारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यातील १० नगरपरिषद व ३ नगरपंचायतीपैकी गडहिंग्लजसह चार नगरपालिका व चंदगड, हातकणंगले या दोन नगरपंचायती अशा सहा नगरपालिकात सत्तांतर झाले. अन्य सात ठिकाणी त्या त्या पक्षांना सत्ता कायम राखण्यात यश आले.

निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धुव्वा उडाला. हातकणंगलेत गेल्यावेळी काँग्रेसचा नगराध्यक्ष होता, पण बहुमत कोणाला नव्हते, यावेळीही नगराध्यक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा झाला आणि स्पष्ट बहूमत कोणाला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हातकणंगलेत शिवसेनेला सहा, काँग्रेसला पाच, भाजपला दोन, ठाकरे सेनेला एक तर तीन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली.

गडहिंग्लजमध्ये मावळत्या सभागृहात जनता दलाचे वर्चस्व होते, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व भाजप सत्तेत सहभागी झाले. यावेळी जनता दलाने जनसुराज्य, भाजप व शिंदे सेनेसोबत आघाडी केली होती, पण त्यांचा यात दारूण पराभव झाला. नगराध्यक्षांसह १७ जागा जिंकून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने नगरपालिका खेचून आणली.

Kolhapur Election Result
Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; वेळ, ठिकाण ठरले? राऊत म्हणाले, धुमधडाक्यात...

शिरोळमध्ये सत्तारूढ आमदार यड्रावकर-माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या विरोधात स्थानिक शिव-शाहू यादव आघाडीची मोट बांधली होती. त्यात यड्रावकर-पाटील गटाचा धुव्वा उडवून यादव आघाडीने नगराध्यक्ष पदांसह १५ जागा जिंकून नगरपालिकेत सत्तांतर घडवले. यड्रावकरांना तीन तर दोन अपक्ष विजयी झाले.

कुरुंदवाडमध्ये जयराम पाटील म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे जयरामबापू असे समीकरण होते. पण यावेळी यड्रावकर व माजी नगराध्यक्ष डांगे यांच्या आघाडीने काँग्रेस आघाडीचा पराभव करत नगरपालिकेत सत्तांतर घडवताना नगराध्यक्ष पदांसह १२ जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ आठ जागा मिळाल्या.

Kolhapur Election Result
Baramati Election Result : बारामतीत लक्ष्मण हाकेंनी दिलेलं आव्हान, ‘ती’ लेक जिंकली; 21 वर्षांच्या संघमित्राकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव

दर पाच वर्षांनी सत्तांतर घडवण्याची परंपरा असलेल्या पेठ वडगांवमध्येही विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखालील यादव आघाडीने नगराध्यक्ष पदांसह १५ जागा जिंकून जनसुराज्य-ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले, या आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या. जिल्ह्यात पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी चंदगड नगरपंचायतीत झाली, या आघाडीत काँग्रेसही सहभागी होते. पण भाजपला पाठिंबा दिलेले आमदार शिवाजी पाटील यांनी नगराध्यक्ष पदांसह आठ जागा जिंकून ही नगरपंचायत ताब्यात घेतली. काँग्रेसला तीन तर दोन्ही राष्ट्रवादीला मिळून पाच जागांवर समाधान मानावे लागले.

पन्हाळा, मलकापूरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने सत्ता कायम ठेवत आपला दबदबा पुन्हा दाखवला. मलकापुरात ‘जनसुराज्य’ला नगराध्यक्षांसह ११ जागा तर शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळून सात जागा मिळाल्या. भाजप व अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली. पन्हाळ्यात सात जागा बिनविरोध करून पुर्वीच ‘जनसुराज्य’ ने ताकद दाखवली होती. निवडणुकीत नगराध्यक्ष पदांसह नऊ जागा ‘जनसुराज्य’ने तर शिव-शाहू आघाडीला दोन, मोकाशी आघाडीला तीन, भाजपला दोन तर चार अपक्षांनीही बाजी मारली.

जिल्हा बँकेचे संचालक व भाजपचे अशोक चराटी यांनी आजऱ्यात आपला करिष्मा दाखवताना सत्ता आपल्याकडेच ठेवली. ते स्वतः नगराध्यक्ष तर भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसला सहा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला एक तर अन्याय निवारण समितीला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com