Uddhav Thackeray, Raj Thackeray Alliance
Uddhav Thackeray, Raj Thackeray AllianceSarkarnama

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; वेळ, ठिकाण ठरले? राऊत म्हणाले, धुमधडाक्यात...

Maharashtra politics Thackeray brothers : राज्यात उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे ठाकरेंकडून उद्याच युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on

Shiv Sena MNS alliance : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची उत्सुकता वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा असणार आहे ती मुंबई महापालिका आणि ठाकरे बंधूंच्या युतीची. या निवडणुकीत पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याने त्याची घोषणा कधी, कुठे, कशी होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मागील काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत आज महत्वाची अपडेट समोर आली आहे. युतीच्या घोषणेसाठी तारीख, वेळ आणि ठिकाणही ठरल्याचे समजते. वरळी डोमध्ये उद्याच संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा होईल, अशी माहिती आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज युतीच्या घोषणेबाबत बोलताना सांगितले की, युतीची घोषणा धुमधडाक्यात, वाजत-गाजत, गुलाल उधळत होईल. कारण हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्षण आहे. ठाकरे बंधूंच मनोमिलन झाले आहे. हे नाटक नाही प्रीतीसंगम आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिकची चर्चा पूर्ण झाली आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray Alliance
Baramati Election Result : बारामतीत लक्ष्मण हाकेंनी दिलेलं आव्हान, ‘ती’ लेक जिंकली; 21 वर्षांच्या संघमित्राकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव

युतीच्या घोषणा कधी होणार याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, मुहूर्त काढला नाही, उद्याही घोषणा करू, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. राज्यात उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे ठाकरेंकडून उद्याच युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीचं काय?

महाविकास आघाडीबाबत बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत मतभेद असू नयेत, अशी आमची खूप इच्छा आहे. राज ठाकरे आणि काँग्रेससह मुंबई महापालिकेत आम्ही लढावं, असे आवाहन आम्ही केले आहे. काँग्रेस मुंबई एकट्याने लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहेत. त्यांची काही गणितं असतील. मुंबईचं राजकारण वेगळं आहे. भाजपचा पराभव करायचा असेल तर आम्ही त्यांना वारंवार एकत्र लढण्याचे आवाहन केले आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray Alliance
Maithili Tambe : विक्रमी मताधिक्य, मैथिली तांबेंसाठी '27' आकडा ठरला लकी; पराभवाचा काढला वचपा...

नगरपरिषदेच्या निकालावर बोलताना राऊत म्हणाले, महायुतीचा कालचा निकाल हे नाटक होते. अमाप पैसा खर्च करण्यात आला. सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली होती. कालचा शो हाऊसफुल्ल नव्हता. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना जिंकायला मदत केली. तेलंगणात बॅलेट पेपरवरील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. विधानसभेसारखेच आकडे आले, त्याच मशीन वापरल्या का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com