

Kolhapur Education News: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांनी कुंभार यांना ताब्यात घेतले. 25 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ही कारवाई झाली आहे.
डी. सी. कुंभार हे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार आहे. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेरच त्यांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका शिक्षकानं लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार विभागाच्या पोलिसांनी सापळा रचला, त्यानंतर आरोपी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तक्रारदार शिक्षक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत बदलीवर आले आहेत. त्यांचा थकीत पगार व पगाराचा फरक मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केला होता. ही रक्कम काढून देण्यासाठी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार यांनी तक्रारदाराकडं ४०,००० रुपयांची मागणी केली होती.
शिक्षणाधिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडं अधिकची चौकशी केल्यानंतर डी.सी. कुंभार यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी आंतर जिल्हा बदलीबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारीपूर्वी 10,000 रूपये स्विकारल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर कबूल केलं. त्यानंतर तक्रारदाराचा थकीत पगार व पगाराचा फरक काढून देण्यासाठी ४०,००० रुपयांची मागणी केली त्याबदल्यात तडजोड करुन २५,००० रूपये स्विकारले.
दरम्यान, तक्रारदाराकडून २५,००० रुपयांची लाच स्वीकारताना कुंभार यांना पोलिसांनी रंगेहात सापडले. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.