Gokul Politics: सतेज पाटलांनी नेमक्या कोणत्या भावकीवर ठेवलं बोट? महायुती की कट्टर राजकीय विरोधक; गोकुळच्या राजकारणात नेमकं काय सुरुए?

Gokul Politics: तीन महिन्यांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीतील घटक पक्षामध्येच आरोप प्रत्यारोपावरून घमासान सुरू आहे.
Satej Patil
Satej Patil
Published on
Updated on

Gokul Politics: गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सतेज पाटील विरुद्ध जिल्ह्यातील सर्व महायुतीचे नेते असे होण्याची संकेत आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्येच सुरू असलेल्या राजकारण आणि त्यावर टीकेची झोड उठवायला आमदार सतेज पाटील यांनी एक ही संधी सोडलेली नाही. अशातच आमदार पाटील यांनी महायुतीतील भावकी हा शब्द उच्चारून? नेमक्या कोणत्या भावकीला टोला लागावला आहेस याचं कोडं कार्यकर्त्यांसह नेत्यांना पडलं आहे.

Satej Patil
Atul Londhe: भाजपनं जुन्या नेत्यांना सोडलं पण काँग्रेसनं राखलं! नागपूरमधून अतुल लोंढेंचं नाव अंतिम; संख्याबळाच्या जुळवाजुळवीवर केलं भाष्य

सध्या महायुतीतील एका राष्ट्रीय पक्षांमधील कोल्हापूरात नेत्यांच्या भावकीत वाद आहे. अशी चर्चा विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहरात सुरू आहे. त्या संदर्भात काही वावड्या उठवण्याचे काम सुरु आहे. गोकुळ दूध संघात अधिक रस दाखवल्याने संबंधित भावकीमध्ये चढाओढ सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असल्याचे दाखवले जाते. अशातच आमदार सतेज पाटील यांना कोणत्या भावकीला टार्गेट करायचे आहे? असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Satej Patil
ED Officer News: संजय राऊत, मलिकांसह देशमुखांना अटक करणाऱ्या 'ईडी'च्या अधिकाऱ्याची अचानक स्वेच्छानिवृत्ती; 11 वर्षांचा कार्यकाळ होता शिल्लक

सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने महायुती ही एकत्र आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे महायुती हे एक कुटुंब मानून भावकी ही उपमा देऊन त्यांच्यावर टिकेची झोड आमदार सतेज पाटील यांच्या उठवली जाते. मात्र सतेज पाटील यांनी 'त्या भावकीला अजून वेळ आहे' असे म्हंटल्यानंतर त्याचा अर्थ काय काढायचा? अशा संभ्रमात कार्यकर्ते आहेत.

Satej Patil
Shiv Sena Appointment: शिवसेनेच्या महिला नेत्याला राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी : राज्यसभेवेळी डावलल्याने होत्या नाराज

सतेज पाटील नेमके काय म्हणाले?

रोज सकाळी उठल्यावर आम्हाला बातमी ऐकायला मिळते भावकीचे भांडण अजून मिटलेलं नाही. एक भावकी म्हणते बांधावरचे भांडण आमचे मिटलेला आहे. बांध वाटून घेतलेला आहे. पण दुसरी भावकी म्हणते अजून आमचं भांडण मिटलेलं नाही. अजून वाटण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे भावकीचे भांडण हे लोकांच्या समोर सुरू आहे. मी सातत्याने उल्लेख करत असलेली भावकी म्हणजे महायुतीतील भावकी. असा खुलासा देत देत प्रश्नाचे उत्तरे संपवताना, त्या भावकीला अजून वेळ आहे. असे म्हणत खोचक टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com