Kolhapur News: प्रचार थांबल्यानंतर सोशल मीडियावर झळकलेले 66 उमेदवार अडचणीत; पोलीस-निवडणूक प्रशासनाचा दणका

Kolhapur Election 2026; 66 Candidates Face Action Over Social Media Posts:14 जानेवारी ते 15 जानेवारी या काळात देखील उमेदवाराने आपल्या प्रचार मोहीम सुरू ठेवली होती. मात्र या सर्वच उमेदवारांवर कोल्हापूर पोलीस सायबर टीम कडून लक्ष ठेवण्यात आलं होतं.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज 81 जागांसाठी मतदान होत आहे. तब्बल 20 प्रभागातून साडेतीनशेहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज प्रत्यक्ष मतदान होत आहे.

13 जानेवारी रोजी जाहीर प्रचार करण्यास मनाई करण्यात आली. समाज माध्यमांवर देखील प्रचाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र या नियमांचे उल्लंघन करत समाज माध्यमांवरील फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप स्टेटसवरून उमेदवारांनी स्वतःच्या प्रचाराची मोहीम सुरूच ठेवली. त्यामुळे सायबर पोलिसांकडून आणि निवडणूक प्रशासनाकडून अशा उमेदवारांना दणका दिला आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 66 उमेदवारांना कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. 14 जानेवारी ते 15 जानेवारी या काळात देखील उमेदवाराने आपल्या प्रचार मोहीम सुरू ठेवली होती. मात्र या सर्वच उमेदवारांवर कोल्हापूर पोलीस सायबर टीम कडून लक्ष ठेवण्यात आलं होतं. दरम्यान 23 जानेवारीला प्रचार मोहीम संपल्यानंतर देखील काही उमेदवारांनी समाज माध्यमांवर आपला प्रचार सुरू ठेवला होता. त्यामुळे अशा 66 पेक्षा अधिक उमेदवारांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

Election Commission
PMC Nivadnuk 2026: वाघोलीला जाऊन मतदान करू नका, अन्यथा रडूस्तर चोप मिळेल : राज ठाकरेंच्या 'तुडवण्याच्या' आदेशाचे पुण्यात पालन

कोल्हापुरात मतदारांकडून प्रतिसाद

शहरातील 20 प्रभागातील मतदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पुरुष मतदारांपेक्षा महिलांनी सकाळच्या सत्रात अधिक सक्रिय सहभाग नोंदवल्याचे चित्र आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी 9.64% तर ११:३० वाजेपर्यंत 22.45% मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत एक लाख 11 हजार 85 इतक्या मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com