Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार गट लढविणार 'या' जागा

Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारी संदर्भात चाचपणीची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात देखील विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात सर्वच पक्षाचा बैठकीचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारी संदर्भात चाचपणीची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात देखील विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

याचं संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी वक्तव्य करून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे. जिल्ह्यातील लोकसभेची जागा काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan sabha Election) राष्ट्रवादीला तीन जागा वाढवून घेऊन सहा जागावर राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला.

NCP Sharad Pawar
Congress News : कोल्हापूर-पुणे टोलविरोधात सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण अन् विश्वजीत कदम आक्रमक, घेतला 'हा' मोठा निर्णय

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीच्या बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलत असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर (Kolhapur) उत्तर अथवा दक्षिण अशा विधानसभेच्या सहा जागावर दावा केला आहे.

NCP Sharad Pawar
Satyajit Kadam News : '..त्यावेळी सतेज पाटलांनी काय दिवे लावले, हे सर्वांनी पाहिले आहे' ; सत्यजित कदमांची टीका!

सध्या राष्ट्रवादीकडे (NCP) पारंपरिक कागल, चंदगड, राधानगरी-भुदरगड हे मतदारसंघ आहेत. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी काँग्रेसला दिल्यानंतर विधानसभेच्या जागा वाढवून घेण्याच्या तयारीत आहे. आपल्या पारंपारिक तीन मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी या मतदार संघावर दावा करण्याच्या तयारीत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकदेखील पूर्ण ताकदी निशी लढण्याचा निर्धार करण्यात आला. उमेदवार कोणीही असो, पण आमदार पक्षाचाच झाला पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com