Land Scam : 243 एकर जमीन प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली, अधिकारी पोलिसांना पत्र देऊन झाले गायब

Gaganbawda 243 Acre Land Case Controversy : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे 243 एकर जमीन घोटाळा उघड झाला असून यात आता वरिष्ठांनी दिलेल्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
Gaganbawda Land Scam Case
Gaganbawda Land Scam Case sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यातील गगनबावडा येथील 243 एकर जमिनी प्रकरणी संबंधित दोषी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले यांनी दिलेल्या आदेशाला गगनबावडा उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी केराची टोपली दाखवली आहे. संबंधित व्यक्ती विरोधात स्वतः उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्याऐवजी थेट सुट्टीवर जाण्याचा मार्ग धरला आहे. यावरून आता प्रशासनाची दिशाभूल करून सातबारामध्ये फेरफार करण्याऱ्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गगनबावडा येथील गट नंबर 14 मधील रद्द झालेले रद्द झालेले वटमुखट्यार जोडून जवळपास 243 एकर जमिनीचा पोटहिस्सा करत तो कजापमध्ये केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी पोटहिस्सा व कजाप आदेश रद्द केला आहे. तसेच संबंधित व्यक्ती कौस्तुभ अरुण आराध्ये याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत. पण या आदेशानंतरही गगनबावडा उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आता समोर आले आहे. यामुळे आता या प्रकरणात काही आर्थिक संबंध दडले आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

मौजे गगनबावडा (ता. गगनबावडा जि. कोल्हापूर) येथील गट नं. १४ ची नियमीत पोटहिस्सा मो.र.नं. ०२६५६०, १८ डिसेंबर २०२४ नूसार ११ मार्च २०२५ रोजी केली मोजणी व त्याअनुषंगाने तयार झालेला मोजणी नकाशा तसेच क.जा.प.नं. ७/२०२५ मंजुर १५ मार्च २०२५ रद्द करणेत येऊन मोजणी पुर्वीची स्थिती कायम करणेत येत आहे, असे आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांनी दिले आहेत. तसेच हे आदेश देताना त्यांनी, जाबदारांनी आवश्यक तर सर्व कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता करुन पोटहिस्सा मोजणीकामी नव्याने अर्ज करुन पोटहिस्सा मोजणी करुन घ्यावी, असेही म्हटले आहे.

Gaganbawda Land Scam Case
Land Scam : विधानसभेत सरकारी जमीन हस्तांतरणाचा मुद्दा नाना पटोलेंनी गाजवला; फडणवीसांना हेरला, आता जिल्हाधिकारी थेट रडारवर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नव्याने तयार करण्यात आलेले सातबारे आणि कजाप आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांनी रद्द केले. तर कागदपत्रांमध्ये फेरफार करून सातबारामध्ये फोड करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे आदेश देखील जिल्हा अधीक्षक भोसले यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख गगनबावडा यांना दिले आहेत.

जिल्हा भूमीलेख अधीक्षक शिवाजी भोसले यांनी हा कब्जापट्टी आणि फोड केलेले सातबारे यांची चौकशी करून ते रद्द केले आहेत. ज्यांनी यामध्ये बेकायदेशीर काम केले आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी प्रतिक्रिया उप भूमी अधीक्षक गगनबावडा वावरे यांनी सरकारनामाशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्याला पाच दिवस उलटूनही गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

Gaganbawda Land Scam Case
Land Scam : जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदारावर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाने खळबळ; बावनकुळेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, याबाबत गगनबावडा भूमी अभिलेख उपाध्यक्ष वावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्यक्तिगत कामासाठी आपण सुट्टी घेतल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात वावरे यांनी उपस्थित राहून गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र त्या संदर्भात ते कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडीचा संशय बळावत आहे.

गुन्हा नोंद करू शकत नाही

गगनबावडा भूमीअभिलेख कर्यालयाकडून गगनबावडा पोलीस ठाण्याकडे केवळ कागदी घोडे नाचवण्यात आले आहेत. सक्षम अधिकारी यांनी उपस्थित राहून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असतें. पण संबंधित अधिकारी यांच्याकडून ऑफिस कर्मचारी यांच्याकडून केवळ पत्र देण्याचे कामं केले आहे. त्याला चार ते पाच दिवस उलटले. मात्र गुन्हा नोंद झाला नाही. याबाबत गगनबावडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सक्षम अधिकाऱ्यांशिवाय आपण गुन्हा नोंद करू शकत नाही असे स्पष्टीकरण दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com