कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे.
नवीन सहाय्यक उपनिबंधक सुजय कदम यांच्या नियुक्तीनंतर प्रक्रिया वेगात येणार आहे.
ठराव मागणी सुरू झाली तरी मतदार यादी जाहीर होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
kolhapur gokul dudh sangh election Update : कोल्हापूर सहाय्यक उपनिबंधक प्रदीप मालगावे यांच्या जागी नवीन सहाय्यक उपनिबंधक सुजय कदम आल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सोमवारपासून ठराव मागणीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता असून या संदर्भातील पत्र दुग्ध विभागाकडून संस्था सभासदांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारपासून जरी ठराव मागणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तरी मतदार यादी जाहीर करण्यासाठी एक महिना अवधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोकुळ दूध संघातील संचालक मंडळाची मुदत येत्या 14 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी दुग्ध विभागाकडून 'गोकुळ'च्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. प्रारूप मतदार यादी बनवण्याचे काम सुरू असतानाच १२०० दूध संस्थांच्या अवसायन कारवाईचा मुद्दा न्यायालयात गेला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबली होती.
१२०० दूध संस्थांबाबत दुग्ध विभागाने निर्णय घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. विभागीय निबंधक दुग्ध यांनी 'गोकुळ' मतदार यादीचा कार्यक्रम सादर करण्याचे पत्र सहायक निबंधक यांना दिले होते. त्याप्रमाणे गुरुवारी सहायक निबंधक यांनी विभागीय निबंधक यांना संस्था सभासदांकडून ठराव मागविण्यास मंजुरी मिळण्याबाबत पत्र दिले.या पत्राला विभागीय निबंधक यांनी मंजुरी दिल्याचे समजते.
दरम्यान संस्था सभासदाकडून ठराव मागण्याच्या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे. नंतर संस्थांकडून मतदानास कोणाचे ठराव द्यायचे याबाबत निश्चित पत्र घेतले जाणार आहे. सर्व ठराव गोळा झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी त्यावर हरकती घेतल्यानंतर पुन्हा अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. तत्पूर्वी तामगाव येथील सद्गुरू दूध संस्थेने १२०० दूध संस्थांबाबत पात्र अपात्रतेचा निर्णय घ्यावा. मगच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करा, अशी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे.
दोन एप्रिल रोजी त्याची सुनावणी होती मात्र ही सुनावणी काही कारणास्तव झाली नाही. येत्या सोमवारी त्याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असून त्यामध्ये जो निकाल येईल त्यावरच पुढची दिशा अवलंबून आहे.
1. गोकुळ निवडणूक प्रक्रिया पुन्हा का सुरू होत आहे?
नवीन सहाय्यक उपनिबंधक सुजय कदम यांच्या नियुक्तीनंतर प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे.
2. ठराव मागणी प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
सोमवारपासून ठराव मागणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
3. मतदार यादी कधी जाहीर होईल?
मतदार यादी जाहीर होण्यासाठी सुमारे एक महिना लागू शकतो.
4. या प्रक्रियेत कोणाचा सहभाग आहे?
दुग्ध विभाग संस्था सभासदांना ठरावाची प्रत पाठवणार आहे.
5. या निवडणुकीचा पुढील टप्पा काय आहे?
ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यादी जाहीर होईल आणि पुढील निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.