Hasan Mushrif On Rohit Pawar: बालेकिल्ल्यात येऊन रोहित पवारांचा हल्लाबोल, हसन मुश्रीफांचाही जशास तसा पलटवार; म्हणाले...

Kolhapur Politics News : कागल तालुक्यातील गटातटाचे राजकारण मी संपवलं आहे.1978 पासून शरद पवार यांचं काम करत आहे. इतक्या वर्षात शरद पवारांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर आली. या काळात सुख-दुःखामध्ये छोटा कार्यकर्ता म्हणून मी साहेबांसोबत राहिलो आहे.
Rohit Pawar-Hasan Mushrif
Rohit Pawar-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे स्वतःच्या स्वार्थासाठी महायुतीमध्ये गेले असा आरोप आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरात केला होता. त्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी बुधवारी (ता.2) एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर तोफ डागली आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, रोहित पवार (Rohit Pawar) हा छोटा बच्चा आहे. मी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. रोहित पवार यांनी आपला वयाचे भान ठेवलं पाहिजे. आता लगेच अजितदादांची स्पेस मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, पण तसं होत नाही. यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात असा टोला पालकमंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

या मतदारसंघातून पाचवेळा मी निवडून आलेलो आहे. परमेश्वराच्या कृपेने 25 वर्षे मला मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. मूलभूत सोयी सुविधा हा मतदारसंघ मी फार पुढे नेला आहे. सरकारच्या सगळ्या योजना मी झोपडीपर्यंत आणि चुलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक योजनांमधील त्रुटी दूर करू शकलो आहे.

Rohit Pawar-Hasan Mushrif
Ahmednagar MVA Politics : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी 'या' जागांसाठी शरद पवारांची घेतली पुण्यात भेट!

कागल तालुक्यातील गटातटाचे राजकारण मी संपवलं आहे.1978 पासून शरद पवार यांचं काम करत आहे. इतक्या वर्षात शरद पवारांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर आली. या काळात सुख-दुःखामध्ये छोटा कार्यकर्ता म्हणून मी साहेबांसोबत राहिलो आहे.

आता हा जो निर्णय घेतला आहे. तो देखील साहेबांना भेटून सांगितला होता.आत्तापर्यंत मी खारीच्या वाट्याप्रमाणे गुरुदक्षिणा शरद पवार यांना दिली आहे. शरद पवार हे माझे दैवत होते, आहेत आणि राहतील, असेही हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले.

पण माझ्यावर ही परिस्थिती ज्यांनी आणली त्यांना घेऊन पवार साहेब फिरत आहेत यावर माझा आक्षेप आहे. साहेबांना माझ्याबद्दल अजिबात राग नाही. यापूर्वी ते अकरावेळा गैबी चौकात सभा घेण्यासाठी आले आहेत. ज्या ज्यावेळी ते गैभी चौकात आले. त्यावेळी त्यांनी सांगितलेला आहे. राजाचा पराभव करा आणि प्रजेला निवडून द्या. जनतेच्या बाजूने राहा. पवारसाहेबांनीच बारावेळा सांगितले म्हणल्यानंतर लोक माझ्यासोबतच राहतील. रयत आतापर्यंत रयतच विजयी झाली असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

मी 35 वर्ष साहेबांसोबत राहिलो या काळात काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुरुदक्षिणा दिली.मात्र, समरजित घाटगे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांनी भाजपमध्ये गेले त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली.फडणवीस यांनी मला सांगितलं की समरजित घाटगे हे आठवड्याला 25 ते 30 पत्र बदल्या आणि निधीची आणत होते.

Summary

मात्र, मला नंतर कळालं की यात किती घोळ झालेला आहे. हे ऐकुन मला धक्का बसला अस फडणवीस मला म्हणाले होते. आज पर्यंत त्यांनी इतका फायदा भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचा घेतला मात्र गुरुदक्षिणा द्यायच्या वेळी पाठीत खंजीर खुपसून गेले अशा शब्दात मुश्रीफ यांनी समाचार घाटगे यांचा घेतला.

लोकसभा निवडणुकीत खोटं नेरेटिव्ह सेट केला गेला.आता तो मुद्दा राहणार नाही. मात्र, लोकसभेनंतर आम्ही जे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठा फरक दिसेल आणि महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येईल. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे.अजितदादांनी सुधा तशी विनंती असल्याची मुश्रीफ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com