Kolhapur, Hatkanangle Exit Poll : कोल्हापुरात 'महाराज'; हातकणंगलेत सरूडकरांची 'पाटीलकी'?

Lok Sabha Election 2024 : देशभरात निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. लोकसभेसाठी आज मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सायंकाळी जाहीर करण्यात आले.
Satyajeet Patil Sarudkar, Shahu Chhatrapati
Satyajeet Patil Sarudkar, Shahu ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक अंदाजातून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी (ता. 4) असून, त्याच दिवशी या निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

देशभरात निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. लोकसभेसाठी आज मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सायंकाळी जाहीर करण्यात आले. त्यात सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या आहेत.

सी-व्होटर, इलेक्ट्रॉल संस्था, लोकशाही, टीव्ही 9, साम आदी वृत्तवाहिन्यांसह अन्य विविध संस्थांनी राज्यातील त्या त्या जिल्ह्यांचा अंदाज जाहीर केला. कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विरुध्द महायुतीचे खासदार संजय मंडलिक अशी लढत होती. ही जागा काँग्रेस 25 वर्षांनंतर चिन्हावर लढत आहे. त्यात श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी असलेला सन्मान, राजर्षी शाहू महाराजांचे वारस, पुरोगामी विचारांचे पाईक या मुद्यांवर सर्वच संस्थांनी शाहू महाराज हेच कोल्हापुरातून विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Satyajeet Patil Sarudkar, Shahu Chhatrapati
PM Narendra Modi : ‘एक्झिट पोल’चे अंदाज येताच मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, संधीसाधू 'इंडी' आघाडी..!

चौरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात ‘वंचित’ची मते सर्वच सर्वेक्षणात बेदखल करण्यात आली आहेत. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात ‘वंचित’च्या उमेदवारास एक लाख 23 हजार मते पडली होती. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी, खासदार धैर्यशील माने यांच्याविषयीची नाराजी आणि शेट्टी यांची धरसोड भूमिका असे मुद्दे मांडत सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी सरूडकर या मतदारसंघातून विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे. पण या मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण राहील, याचीही उत्सुकता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Satyajeet Patil Sarudkar, Shahu Chhatrapati
Lok Sabha Exit Poll Results 2024 : नाशकात ठाकरे करून दाखविणार, राजभाऊ वाजे दिल्लीला जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com