PM Narendra Modi : ‘एक्झिट पोल’चे अंदाज येताच मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, संधीसाधू 'इंडी' आघाडी..!

Lok Sabha Election Exit Poll 2024 Narendra Modi tweet : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून एक्झिट पोलचे अंदाजही समोर आले आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
PM Narendra Modi Rahul Gandhi Exit Poll
PM Narendra Modi Rahul Gandhi Exit PollSarkarnama

PM Narendra Modi On Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. चार जूनला मतमोजणी असली तरी एक्झिट पोलमध्ये पुन्हा एनडीची सत्ता येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानतानाच इंडिया आघाडीवर टीका केली आहे. आमचे कार्यकर्ते आमची सर्वात मोठी ताकद असून मी त्यांचे कौतुक करतो, असे मोदींनी म्हटले आहे.

संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी सरकारचा विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहचवला, त्यांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले, त्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतूक करू इच्छित असल्याचे मोदी म्हणाले आहेत.

PM Narendra Modi Rahul Gandhi Exit Poll
Lok Sabha Election 2024 Exit Polls : दिल्लीचे तख्त मोदी राखणार; काँग्रेसचे दावे फोल ठरण्याचे अंदाज...

इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, संधीसाधू इंडिया आघाडीला मतदारांशी ताळमेळ साधण्यात अपयश आले. ते जातीयवादी, सांप्रदायिक आणि भ्रष्ट आहेत. मुठभर राजघराण्यांची रक्षण करणे हाच आघाडीचा उद्देश होता. ते देशाला भविष्याची दृष्टी दाखवण्यात अपयशी ठरले.

केवळ मोदींवर टीका करण्यातच त्यांनी धन्यता मानली. अशा प्रतिगामी राजकारणाला जनतेने नाकारल्याची टीका मोदींनी केली आहे. भारतातील लोकांनी पुन्हा एका एनडीए सरकार निवडून देण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान केल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सर्वच एक्झिट पोलने एनडीएला 360 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एबीपी-सी वोटरने एनडीएला 353 ते 383 जागा दाखवल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढून 70 च्या पुढे जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.

PM Narendra Modi Rahul Gandhi Exit Poll
Andhra Pardesh Exit Poll 2024 : जगनमोहन यांच्यासह बहिणीचाही सुपडा साफ; सर्वात धक्कादायक निकाल लागणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com