Kolhapur Ichalkaranji Mayor: कोल्हापूर, इचलकरंजीत महापौरपदाची लॉटरी कोणाला? दोन्ही महापालिकांसाठी OBC आरक्षण,रेसमध्ये कोण कोण?

Kolhapur Ichalkaranji mayor Election : कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांसाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये महापौरपदासाठी जोरदार चुरस सुरू झाली आहे.
Leaders and corporators of BJP, Shiv Sena and NCP during discussions after OBC reservation was declared for Kolhapur and Ichalkaranji Municipal Corporation mayor posts.
Leaders and corporators of BJP, Shiv Sena and NCP during discussions after OBC reservation was declared for Kolhapur and Ichalkaranji Municipal Corporation mayor posts.Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर महापौरपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. सर्वच विजयी उमेदवारांना उत्कंठा लागून राहिली होती. अखेर आज दोन्ही महापालिकांसाठी आरक्षण सोडत पार पडली असून दोन्हीसाठी OBC आरक्षण पडले आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांमधील इच्छुक नगरसेवकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. निवडणुकीत दोन्ही ठिकाणी युतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. महापौरपदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याने महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी महायुतीतील OBC प्रवर्गातील विजयी नगरसेवकांनी महापौरपदावर आपलाच दावा कसा भक्कम राहील याची तयारी सुरु केली आहे. यातील इच्छुकांची नावेही समोर आली आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण गटातून निवडून आलेले मुरलीधर जाधव, रूपाराणी निकम तर ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले विजयसिंह उर्फ रिंकू देसाई, प्रमोद देसाई, विशाल शिराळे आणि वैभव कुंभार यांच्यात स्पर्धा असणार आहे. जर शिवसेनेकडे महापौर पद गेल्यास तर अजय इंगवले, अश्किन आजरेकर, ही नावे आहेत. मात्र भाजपचा महापौरपदावर दावा असल्याने ही संधी सोडण्याच्या तयारीत नाही.

Leaders and corporators of BJP, Shiv Sena and NCP during discussions after OBC reservation was declared for Kolhapur and Ichalkaranji Municipal Corporation mayor posts.
Kolhapur mayor election : सतेज पाटलांच्या ‘बॅक डोअर चर्चांना’ पूर्णविराम!महाडिकांविरोधातील डावही फसला? शिंदेच्या शिलेदारानं विषयचं संपवला

इचलकरंजी महापालिकेसाठी मोठी स्पर्धा आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत ही निवडणूक लढवली असली तरी इचलकरंजीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे यावर भाजपचाच दावा असणार आहे. विठ्ठल चोपडे, तानाजी पोवार, राजू बोन्द्रे, सुशांत कलगते, राजू पुजारी, उदय धातुंडे, योगेश पाटील यांच्यात महापौर पदासाठी चुरस असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com