Ramraje Nimbalkar News : रामराजे विरोधकांवर भडकले; म्हणाले, "आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर...

Maharashtra Politics : विरोधकांना मात्र हे बघवत नसल्याने त्यांनी कारखान्यात राजकारण करण्यास सुरुवात केली आहे,
Ramraje Nimbalkar News
Ramraje Nimbalkar News Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. "आमच्या पायात पाय घालण्याचा जो प्रयत्न करेल. त्याचा पाय निघेल," असा इशारा रामराजेंनी दिला.

"श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांनी चिंता करू नये. हा कारखाना आता अवसायानातून सुस्थितीत आला आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच श्रीरामही ऊसदर देऊन शेतकरी समृद्ध करण्याचे काम करेल. विरोधकांना मात्र हे बघवत नसल्याने त्यांनी कारखान्यात राजकारण करण्यास सुरुवात केली आहे," असे रामराजे म्हणाले.

Ramraje Nimbalkar News
Sharad Pawar News : समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरांमध्ये पोहाेचवणं गरजेचं : शरद पवार; भागवत वारकरी संमेलनास सुरुवात

श्रीराम कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सभेत रामराजे बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह संचालक उपस्थित होते.

आपण कितीही धरणे बांधली; पण जर पाऊसच पडला नाही, तर धरणात पाणी येणार कुठून? असा सवाल रामराजेंनी केला. ते म्हणाले, ‘‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त धरणातील पाणी आपल्याला कसे मिळेल, याचा विचार न करता आज अनियमित पाऊस का पडत आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. उसाचा गाळप हंगाम तीन महिनेच चालतो. कारण उसाचे उत्पादनच निघत नाही. त्यामुळे कारखान्याचा दर आणि रिकव्हरी याचा विचार करून चालणार नाही. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाची अनियमितता आहे. त्यामुळे अशा हवामानामध्ये आपल्याला कमी पाण्यावर येणारे उसाचे वाण तयार केले पाहिजेत, तरच यापुढील काळात आपल्याला उसाचे उत्पादन घेता येईल."

"श्रीराम कारखाना आज सुस्थितीत असल्याचे विरोधकांना बघवत नाही. अगोदर त्यांनी स्वत:च्या कारखान्यावर किती कर्ज आहे, देणी किती आहेत, रिकव्हरी किती आहे, गाळप क्षमता किती आहे, हे पाहावे. जे 'श्रीराम'ला ऊस घालत नाहीत. ते आता या कारखान्यावर बोलत आहेत. श्रीराम कारखान्याने केलेले करार पारदर्शक आहेत. हे करार झाले नसते, तर आज हा श्रीराम चालू स्थितीत दिसला नसता. कारखाना आता अवसायानातून सुस्थितीत आला आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच श्रीरामही ऊसदर देऊन शेतकरी समृद्ध करण्याचे काम करेल. विरोधकांना मात्र हे बघवत नसल्याने त्यांनी कारखान्यात राजकारण करण्यास सुरुवात केली आहे," असे रामराजे म्हणाले.

Ramraje Nimbalkar News
Uday Samant News : मुघलांना संताजी-धनाजी दिसायचे तसे विरोधकांना एकनाथ शिंदे दिसतात; सामंतांचे ठाकरेंवर टीकास्त्र...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com