Kolhapur Lok Sabha: मुख्यमंत्री शिंदेंची रात्रभर खलबतं, सभेचा घेतला आढावा

Kolhapur Lok Sabha Election 2024: कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज तपोवन मैदान येथे होणार आहे.
Cm Eknath Shinde, Uday Samant
Cm Eknath Shinde, Uday SamantSarkarnama

Kolhapur Lok Sabha News: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघांचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज तपोवन मैदान येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (26 एप्रिल) रात्री कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी तपोवन येथे जाऊन सभास्थळाची पाहणी केली. बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था याची माहिती घेत योग्य त्या सूचना पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला केल्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसमवेत चर्चा कैली. या वेळी त्यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले (Hatkanangale) मतदारसंघातील राजकीय स्थितीचा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेच्या तयारीचाही आढावा घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे यांचे रात्री सव्वाआठच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते तपोवन मैदानावर आले. या ठिकाणी त्यांनी सभामंडपाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यानंतर हॉटेलवरच त्यांनी प्रचाराचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी त्यांचे हॉटेलवर स्वागत केले.

Cm Eknath Shinde, Uday Samant
Shivsena Vs BJP: "मंगळसूत्रास हात घातला मोदींनी अन् कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर," ठाकरे गटाचा हल्लाबोल

या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, 'गोकुळ चे आध्यक्ष अरुण डोंगळे उपस्थित होते. रात्रीच्या चर्चेत नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, धैर्यशील माने सहभारगी झाले. या वेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com